लसीकरणात महानगरपलिका आघाडीवर या बातमीचा जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST2021-09-09T04:30:14+5:302021-09-09T04:30:14+5:30
कोल्हापूर महापालिकेकडे सर्व वयोगटासाठी पुरेसा लसीचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचा आजअखेर पहिला डोस ...

लसीकरणात महानगरपलिका आघाडीवर या बातमीचा जोड
कोल्हापूर महापालिकेकडे सर्व वयोगटासाठी पुरेसा लसीचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचा आजअखेर पहिला डोस २५ टक्के, तर दुसरा डोस १६ टक्के झाला आहे. महापालिकेकडे पुरेसा लसीचा साठा उपलबध असूनही गेल्या चार दिवसांत ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे स्लॉट रिकामे राहत आहेत. म्हणूनच या वयोगटातील नागरिकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून लसीकरण करून घ्यावे. महापालिकेच्यावतीने १ॅ८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी शनिवार, दि.११ सप्टेंबरली दुपारी १२ वाजल्यापासून दि. १३ ते १६ सप्टेंबरअखेर सहा दिवसांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी स्लॉट खुले केले जाणार आहेत. या कालावधीत नागरिकांनी जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.