पूर बातमी जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:26 IST2021-08-15T04:26:08+5:302021-08-15T04:26:08+5:30
अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील बाराही तालुक्यांना कमी अधिक प्रमाणात फटका बसलाच आहे. त्यापैकी करवीर, शिरोळ, हातकणंगले येथील प्रमाण अधिक ...

पूर बातमी जोड
अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील बाराही तालुक्यांना कमी अधिक प्रमाणात फटका बसलाच आहे. त्यापैकी करवीर, शिरोळ, हातकणंगले येथील प्रमाण अधिक आहे. पंचनाम्यांसाठी तालुका स्तरावर पथके नियुक्त करण्यात आली होती. पुराचे पाणी ओसरल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पंचनाम्याला सुरुवात झाली होती. पंचनामे पूर्ण करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र बाधित क्षेत्र जास्त असल्याने या मुदतीत ते पूर्ण होऊ शकले नाही, आता मात्र कृषी वगळता अन्य सर्व प्रकारच्या नुकसानीचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.
---
पुढील प्रक्रिया अशी...
एकदा पंचनामे पूर्ण झाले की झालेल्या नुकसानीची रक्कम शासनाला कळवली जाते. या रकमेच्या मागणीचा प्रस्ताव पाठवला जातो. झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात ठरलेली रक्कम येऊन ती शेवटच्या बाधिताच्या हातात पोहोचेपर्यंत किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो.
-----