शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित कृषि वीज पंपाच्या जोडण्या तात्काळ जोडा, आमदार प्रकाश आबिटकर यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 15:42 IST

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आॅक्टोंबर २0१७ अखेर अनुक्रमे ८४६२ आणि १५७७५ असे एकूण २४२३७ कृषिपंप जोडण्या पैसे भरुनही प्रलंबित असल्याबाबतचा प्रश्न आमदार प्रकाश आबिटकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केला.

ठळक मुद्देआमदार प्रकाश आबिटकर यांची तारांकित प्रश्नाव्दारे विधानसभेत मागणीकृषिपंपाना वीज जोडण्या देण्याचे काम प्रगतीपथावर कृषि वीज जोडण्या प्रलंबित असल्याचे उजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले मान्य कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ८४६२ कृषिपंप जोडण्या प्रलंबितसांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची १५७७५ कृषिपंप जोडण्या प्रलंबित

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आॅक्टोंबर २0१७ अखेर अनुक्रमे ८४६२ आणि १५७७५ असे एकूण २४२३७ कृषिपंप जोडण्या पैसे भरुनही प्रलंबित असल्याबाबतचा प्रश्न आमदार प्रकाश आबिटकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केला.उजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तरामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृषि वीज जोडण्या प्रलंबित असल्याचे मान्य केले. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यामधील गडहिंग्लज विभागामध्ये १८८२, इचलकरंजी विभागामध्ये १६९ जयसिंगपूर विभागामध्ये १९३३ ग्रामीण विभाग १ मध्ये २५७६, ग्रामीण विभाग २ मध्ये २६९२ आणि कोल्हापूर शहरामध्ये १0 असे ८४६२ कृषि पंप जोडण्या प्रलंबित असल्याचे उजार्मंत्र्यांच्या निदर्शनास आणले.यावेळी उजार्मंत्री म्हणाले, राज्यात प्रलंबित कृषिपंपाना नवीन वीज जोडणी देण्यासाठी आवश्यक निधी उभारुन त्यामधून ही कामे करण्याची कार्यवाही महावितरण कंपनीमार्फत करण्यात येत आहे. सध्यस्थितीमध्ये मीटर उपलब्ध असून शुन्य पोल लागत असलेल्या कृषिपंपाना वीज जोडण्या देण्याचे काम प्रगतीपथावर आहे.कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये सन २0१६-१७ मध्ये अनुक्रमे ८३७६ प ६९३६ कृषिपंपाना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. तसेच या जिल्ह्यामध्ये सन २0१७-१८ मध्ये आॅक्टोबर २0१७ अखेर अनुक्रमे २0३३ व ७१0 कृषि पंपाना वीज जोडण्या देण्यात देण्यात आल्या आहेत व उर्वरीत कृषिपंपाना वीज जोडण्या देण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७kolhapurकोल्हापूरMLAआमदार