शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

कोईल गावचा ‘आदर्श गणेशा’ --प्राचीन परंपरा

By admin | Updated: September 6, 2016 23:44 IST

: ‘एक गाव-एक गणपती’, मंदिरातच केला जातो गणेशोत्सोव--मंतरलेले दिवस

सिद्धेश आचरेकर -- मालवण -कोकणला अनेक वर्षांची धार्मिक परंपरा आहे. प्रत्येक गावाची वेगळी परंपरा असून विज्ञान युगातही अंधश्रद्धा नव्हे तर श्रद्धा म्हणून जोपासली जाते. प्रत्येक धार्मिक सणाला व उत्सवाला वेगवेगळे महत्त्व येथे प्राप्त झाले आहे. कोकणचा महाउत्सव म्हणून गणेशोत्सव वर्णिला जातो. घरोघर गणपतीच्या मूर्ती बसवून अखंड कोकण भक्तीसागरात लोटतो. गणेशभक्तांच्या उत्साहाला अक्षरश: उधाण आलेले असते. हे नाकारून चालणार नाही पण नदीच्या कुशीत बसलेल्या एका गावात कोणाच्याही घरात गणपती पूजन केले जात नाही. अहो, इतकेच काय तर गणपतीचे छायाचित्रही तुम्हाला कोणा ग्रामस्थांच्या घरात चुकूनही दिसणार नाही. हे गाव आहे मालवण तालुक्यातील कोईल.कोकणातील गणेशोत्सवात घराघरांत मातीच्या गणपती मूर्ती विराजमान होतात. पाच दिवसांपासून ते ११ ते २१ दिवसांपर्यंत हा उत्सव होत असतो. कोईल गावात मात्र सारे काही वेगळे असते. घराघरांत गणपती पूजन न करता गावाची ग्रामदेवता श्री गणेश मंदिरातील मूर्तीचे पूजन केले जाते. कोईल गावात ज्यावेळी गणपती स्थानापन्न झाले त्यावेळी पूर्वजांनी मंदिरातील गणपतीशिवाय कुठच्याही मूर्तीची पूजा होणार नाही असे वचन दिले. त्यानुसार गावाची परंपरा अखंडपणे भक्तिमय वातावरणात सुरू आहे. गावात साटम महाराजांच्या जन्मस्थानाची वास्तु आहे. सातेरी देवीचे मंदिर आहे. त्याची यथासांग पूजा केली जाते. गणेश मंदिरात माघी गणेशोत्सव आणि वार्षिकोत्सवही दिमाखात साजरे होतात. गणेशोत्सव काळात गावातील ग्रामस्थांच्या भक्तीने गणपती मंदिर बहरून जाते. गणेशोत्सवात जरी घराघरांत ‘बाप्पा’ विराजमान होत नसला तरी कुठेच उत्साहाची कमी नसते. नैवेद्याचा थाटमाट तोच असतो जो समस्त कोकणवासियांच्या घराघरांत असतो. श्रद्धाळू भाविकांच्या भक्तीने गणपती मंदिर अहोरात्र फुलून जाते. कोईलमध्ये या लौकिक सोहळ्याचे नेत्रसुख घेणे ही एक पर्वणीच असते. देवळात अकरा दिवस आरती होते. गावकऱ्यांकडून गाऱ्हाणी घातली जातात. प्रत्येक घरातून देण्यात आलेल्या शिधातून गणपतीचा प्रसाद होतो. घराघरांत गणपती पूजन होत नसले तरी गौरीचे पूजन केले जाते. काही मुंबईस्थित ग्रामस्थांना गावी येण्यास शक्य न झाल्यास ते श्रीफळाची पूजा करतात. कोईलच्या गणेशोत्सवाविषयी...कोईल चारिवडे गावातील जनता गावाबाहेरील मातीतून कोणतीही मूर्ती घडवत नाहीत. कुठच्याही भागातील मातीच्या मूर्तीला हात लावून नमस्कार करत नाहीत. या श्रद्धेची परंपरा येथे पिढ्यानपिढ्या जोपासली गेली आहे. मात्र गणेशोत्सवात गणरायाची आराधना करण्यात कोणतीही कसूर ठेवली जात नाही. कोईल गावाचा गणेशोत्सव थाटात साजरा होतो. यावेळी गावातील गणपती मंदिरातील काळ्या दगडात कोरलेली अडीच ते तीन फुटाच्या पाषाणाची यथासांग विधीवत पूजा होते. हा अकरा दिवस गावचा उत्सव संपूर्ण वातावरण मंगलमय करणारा असतो. ‘एक गाव एक गणपती’ ही कोईलवासियांची प्राचीन परंपरा आहे. ११ दिवस गणेशोत्सवानंतर विसर्जनासाठी पालखी सजवली जाते. स्वयंभू मंदिरातील गणपती मूर्तीचे विसर्जन न होता फुलपात्रे, निर्माल्य त्या पालखीत ठेवली जातात. ढोलताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढून गडनदीपात्रात निर्माल्याचे विसर्जन केले जाते. यावेळी भक्तांकडून काही चूक झाली असल्यास मनोमन क्षमा मागितली जाते. कोईल येथील धार्मिक कार्यक्रमात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यावेळी मुस्लिम बांधवांची वस्ती असल्याचे दाखलेही ग्रामस्थांकडे आहेत..सीमेबाहेरील मातीला ग्रामस्थ हातही लावत नाहीत गावात सीमेपलीकडून कोणत्याही कारणासाठी माती आणू नये. तशा मातीची मूर्ती करू नये अशी परंपरा असल्याने गणपती मंदिर परिसरातील विशिष्ट जागेवरील माती नागपंचमी दिवशी घराघरात नागाच्या मूर्तीसाठी वापरली जाते. गणपतीच्या मंदिरात कृष्णाष्टमीचा उत्सव होतो तेव्हाही हीच माती मूर्तीसाठी वापरतात. हरितालिका मूर्ती असो वा सरस्वतीची मूर्ती गावातील मातीच यासाठी वापरली जाते. गावाबाहेरच्या मातीच्या मूर्तीला कोईलवासीय हात लावत नाहीत. मूर्ती पूजेबाबत नव्हे तर गणपतीच्या मूर्तीसाठी आवश्यक असणारा कोणताही भाग कोईल गावच्या सीमेतून नेला जात नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.