फोर्ब्सच्या यादीत ॲड युवराज नरवणकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 18:55 IST2021-04-02T18:53:41+5:302021-04-02T18:55:17+5:30
Forbes Kolhapur-जगद्विख्यात फोर्ब्स मासिकाने भारतातील सर्वोत्तम आणि प्रभावशाली वकिलांच्या जाहीर केलेल्या यादीमध्ये ॲड युवराज नरवणकर यांचा यावर्षी समावेश केला आहे. दरवर्षी उद्योग क्षेत्रातील नामांकने फोर्ब्सतर्फे जाहीर केली जातात. यावर्षी पहिल्यांदाच कायदा क्षेत्राचा समावेश या नामांकनांमध्ये केला होता.

फोर्ब्सच्या यादीत ॲड युवराज नरवणकर
कोल्हापूर : जगद्विख्यात फोर्ब्स मासिकाने भारतातील सर्वोत्तम आणि प्रभावशाली वकिलांच्या जाहीर केलेल्या यादीमध्ये ॲड युवराज नरवणकर यांचा यावर्षी समावेश केला आहे. दरवर्षी उद्योग क्षेत्रातील नामांकने फोर्ब्सतर्फे जाहीर केली जातात. यावर्षी पहिल्यांदाच कायदा क्षेत्राचा समावेश या नामांकनांमध्ये केला होता.
नरवणकर सध्या मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय येथे कार्यरत असून अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये आणि याचिकांमध्ये त्यांचा महत्वपूर्ण सहभाग राहिला आहे न्यायालयातील अनुभव, लवाद क्षेत्रातील काम आणि तंत्रज्ञान कायद्यातील प्रभुत्व हे निकष नामांकनंसाठी वापरले गेले.
नरवणकर मूळ कोल्हापूरचे चे उच्च शिक्षण मुंबई आणि लंडन येथे झाले आहे. यावर्षीच्या नामांकन आणि अंतिम निवड समिती मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मदन लोकूर, न्यायमूर्ती ए. के. सिक्री, सह-सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी, सर्वोच्च न्यायालयातील सिद्धार्थ लुथ्रा सह इतर अनेक वरिष्ठ अधिवक्ता, आणि चार नॅशनल लॉ स्कूल चे कुलगुरू यांचा समावेश होता. काल दिल्ली येथे वर्च्युअल स्वरूपात झालेल्या कार्यक्रमांमध्ये या नावांची घोषणा करण्यात आली. लवकरच या कार्यक्रमाचे प्रक्षेपण दूरचित्रवाणीवर देखील होणार आहे.