शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बनावट एचएसआरपी नंबरप्लेट करणाऱ्या दुकानावर कारवाई; चार लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 11:56 IST

ऑनलाईन नोंदणी बासनात, ५०० रुपयांत नंबरप्लेट

हातकणंगले : राज्य शासन आणि मोटार वाहन विभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नसताना बनावट एचएसआरपी नंबर प्लेट बनवून त्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या संतोष बबन यादव (वय ३१ रा. यादव गल्ली, साजणी) याला स्थानिक गुन्हा शाखा, कोल्हापूर विभागाने रंगेहाथ पकडून त्याच्याकडील ४ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक करून इचलकरंजी येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता झाली. साजणी (ता. हातकणंगले) येथील बसस्टॉपशेजारी तो बनावट नंबरप्लेट बनवत होता.कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पथकानी साजणी बसस्टँड शेजारील संतोष यादव याच्या मालकीच्या रेडियम आर्टस दुकानावर सकाळी दहा वाजता छापा टाकून बनावट एचएसआरपी नंबरप्लेट बनवत असलेल्या मशिनरी, साहित्य, नंबरप्लेट आणि इतर सामग्री जप्त केली.त्यामध्ये २ लाख ५० हजारांचे डायप्लेट अँम्बस मशीन, १ लाख किमतीचे आयएनडी छाप असलेला फाईल हिटर, नंबरप्लेट, त्याला लागणारे साहित्य असा ४ लाख ६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हे शाखेचे नवनाथ कदम यांनी दिली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नानासाहेब पवार करत आहेत.

५०० रुपयांत नंबरप्लेटसंतोष यादव याच्या रेडियमच्या दुकानात बनावट नंबरप्लेट बनवून ग्राहकाकडून ५०० रुपये घेत असल्याने त्याच्याकडे दुचाकी वाहनधारकांची रिघ लागत असे.

ऑनलाईन नोंदणी बासनातबनावट एचएसआरपी नंबरप्लेटसाठी ऑनलाईन नोंदणी करून संतोष यादव बेकायदेशीरपणे नंबरप्लेट बनवत असल्याचे उघड झाले. जिल्ह्यात अशी पहिलीच कारवाई झाल्याने शासन आणि मोटारवाहन विभागाच्या परवानगीशिवाय काम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Fake HSRP Number Plate Racket Busted, Goods Worth Lakhs Seized

Web Summary : A raid in Kolhapur busted a fake HSRP number plate operation. Authorities arrested Santosh Yadav for illegally manufacturing and selling them. Police seized ₹4.06 lakh worth of equipment and materials from his shop near Sajani bus stand. He charged ₹500 per plate.