धरणाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांवर कारवाई करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:27 IST2021-07-30T04:27:08+5:302021-07-30T04:27:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी : वासनोली, ता. भुदरगड येथे बांधलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. नुकतेच या ...

धरणाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांवर कारवाई करावी
लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी : वासनोली, ता. भुदरगड येथे बांधलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. नुकतेच या धरणाच्या सांडव्याला भगदाड पडले असून धरणाच्या मुख्य भिंतीला धोका निर्माण झाला आहे.धरण फुटून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असल्याने या धरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि अडगिकऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन काँग्रेसच्या वतीने तहसीलदार अश्विनी अडसूळ यांना देण्यात आले आहे.
निवेदन देताना तालुकाध्यक्ष शामराव दादा देसाई,कलनाकवाडीचे माजी सरपंच प्रताप वारके, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव शंभूराजे देसाई,सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत माळवी,युवा नेते धनाजी कुरळे,राधानगरी विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव रोहित मोरे,एन.एस.यु.आय चे भुदरगड तालुका अध्यक्ष धनंजय पाटील,अरमान देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळ
वासणोली धरणाच्या चौकशीचे निवेदन तहसीलदार यांच्या वतीने स्वीकारताना अव्वल कारकून पोवर निवेदन देताना शामराव देसाई,सुशांत माळवी,शंभूराजे देसाई,अरमान देसाई आदी.