शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

मराठा दाखल्यांसाठी सहकार्य न करणाऱ्या ‘महा-ई-सेवा’ केंद्रांवर कारवाई : गिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 1:29 PM

मराठा दाखल्यांसाठी सहकार्य न करणाऱ्या महा-ई-सेवा केंद्रचालकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा करवीरचे तहसीलदार सचिन गिरी यांनी येथे दिला. शाहू स्मारक भवन येथे अ. भा. मराठा महासंघातर्फे मराठा व तत्सम जात दाखला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देमराठा दाखल्यांसाठी सहकार्य न करणाऱ्या ‘महा-ई-सेवा’ केंद्रांवर कारवाईमराठा दाखला शिबिर : मराठा महासंघातर्फे आयोजन

कोल्हापूर : मराठा दाखल्यांसाठी सहकार्य न करणाऱ्या महा-ई-सेवा केंद्रचालकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा करवीरचे तहसीलदार सचिन गिरी यांनी येथे दिला.शाहू स्मारक भवन येथे अ. भा. मराठा महासंघातर्फे मराठा व तत्सम जात दाखला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक होते. प्रमुख उपस्थिती महा-ई-सेवा केंद्रचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पिराजी संकपाळ, प्रकाश पाटील, प्रताप नाईक, चंद्रकांत चव्हाण, शरद साळुंखे, विजय काकोडकर, दिलीप मिसाळ, शैलजा भोसले, आदींची होती.यावेळी तहसीलदार गिरी यांनी उपस्थित पालकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. योग्य कागदपत्रे सादर केल्यास मराठा जात दाखले तत्परतेने दिले जातील. त्यासाठी आम्ही बांधिल असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकांनी महा-ई-सेवा केंद्रचालकांकडून मराठा दाखल्यांसंदर्भात सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी मांडल्या. यावर सहकार्य न करणाºया केंद्रचालकांवर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार गिरी यांनी दिला.पिराजी संकपाळ यांनी जात दाखला काढण्याची माहिती अत्यंत सुलभ पद्धतीने व सोप्या भाषेत दिली. केंद्र सरकारच्या नोकरीसाठी १० टक्के आरक्षण लागू असून, त्यासाठी दाखला काढण्याबाबत, तसेच सीमावासीयांच्या दाखल्याबाबतही माहिती दिली. मराठा जात (एसईबीसी) दाखला काढण्यासाठी १३ आॅक्टोबर १९६७ पूर्वीचा (रहिवासी पुरावा म्हणून) सात-बारा, प्रॉपर्टी कार्ड, महापालिकेचा अ‍ॅसेसमेंट उतारा, खरेदी दस्त, घरभाडे पावती, आदी कागदपत्रे ग्रा' धरण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.वसंतराव मुळीक यांनी मराठा जात दाखल्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत मराठा महासंघाशी संपर्क साधण्याचे आवाहन समाजबांधवांना केले. यावेळी विजय काकोडकर यांनी स्वागत केले. दिलीप मिसाळ यांनी प्रास्ताविक केले. तर अवधूत पाटील यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :marathaमराठाkolhapurकोल्हापूर