धरणगुत्ती, अर्जुनवाडमध्ये जुगार अड्ड्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:25 IST2021-08-15T04:25:55+5:302021-08-15T04:25:55+5:30
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती व अर्जुनवाड येथील तीन पानी जुगार खेळणाऱ्या २६ जणांवर शिरोळ पोलिसांनी कारवाई केली. या ...

धरणगुत्ती, अर्जुनवाडमध्ये जुगार अड्ड्यावर कारवाई
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती व अर्जुनवाड येथील तीन पानी जुगार खेळणाऱ्या २६ जणांवर शिरोळ पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ४ लाख ४८ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये नऊ मोटरसायकलींचा समावेश आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
धरणगुत्ती येथे सुरेश आरगे यांच्या शेतामधील खोपीच्या आडोशाला विनोद बाळासोा पाटील, भाऊसोा देवाप्पा कांबळे, सुरेश मुरारी आरगे, शशिकांत अशोक चौगुले, शेखर शिवगोंडा पाटील, नामदेव सदाशिव कांबळे (सर्व रा. धरणगुत्ती), सुनील लक्ष्मण माळी, गुंडाप्पा ज्ञानू पवार (दोघे रा. नांदणी), महेशल अमृत मडिवाळ व जय (पूर्ण नाव नाही) (दोघे रा. उदगांव) या दहा जणांवर कारवाई करण्यात आली. तर अर्जुनवाड येथे ज्ञानदेव मगदूम यांच्या शेतातील खोलीमध्ये जुगार खेळणाऱ्या प्रदीप विष्णू मगदूम, प्रवीण अशोक मगदूम, प्रमोद रावसोा देशिंगे, बताश कृष्णा साळुंखे, धोंडिबा सुखदेव डोंगरे, राहुल शिवाजी देसाई, प्रदीप रंगराव डोंगरे, तानाजी श्रीमंत देसाई, दत्तात्रय काशिनाथ डोंगरे, संजय महादेव यादव, आनंदा शंकर सूर्यवंशी, प्रदीप आप्पासोा पाटील, अमोल वसंत चौगुले, विकास हंबीरराव पाटील, दीपक आप्पासो मगदूम, संतोष वसंत पाटील आदी सोळा जणांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर सानप, हनुमंत माळी, ताहीर मुल्ला, गजानन कोष्टी, युवराज खरात यांच्या पथकाने केली.