शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

शिवाजी पुलावरून उडी मारणाऱ्यास रोखले नोकरी नसल्याच्या नैराश्येतून कृत्य; घटनेने पोलिसांची तारांबळ,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 00:33 IST

राज्यभर मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी ‘बंद’ आंदोलन सुरू असताना गुरुवारी दुपारी शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीपात्रात उडी मारण्याचा प्रयत्न करणाºया तरुणाला मराठा

कोल्हापूर / पोर्ले तर्फ ठाणे : राज्यभर मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी ‘बंद’ आंदोलन सुरू असताना गुरुवारी दुपारी शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीपात्रात उडी मारण्याचा प्रयत्न करणाºया तरुणाला मराठा मावळ्यांनी रोखले. नवनाथ जयसिंग कारंडे (वय ३४, रा. जरगनगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. नोकरी नसल्याच्या नैराश्येतून आपण हा निर्णय घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलीस अधीक्षकडॉ. अभिनव देशमुख यांनी त्याला धीर देऊन मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने पोलिसांची तारांबळ उडाली. त्यानंतर शिवाजी पुलावरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली.

सकल मराठा समाजातर्फे आयोजित केलेल्या सभेला मराठा कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. सभा संपल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास पन्हाळा, शाहूवाडी आणि करवीरच्या पश्चिम भागातील मराठा कार्यकर्ते शिवाजी पुलावरून जात असताना एक तरुण शिवाजी पुलावरून नव्या अर्धवट पुलावर चढलेला नजरेस पडला. हा प्रकार पाहून पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील मराठा कार्यकर्ते प्रेमजित पाटील, प्रशांत खवरे, श्रीधर शिंदे, सुशील शेवडे यांनी क्षणाचाही विलंब न करता पुलाकडे धाव घेत नवनाथला मिठी मारून पकडले. या प्रसंगाने पाहणाºयांच्या अंगाचा थरकाप उडाला. त्याला कार्यकर्त्यांनी पकडल्यानंतर तो आरक्षणाच्या घोषणा देत होता. ‘कधी मिळणार आरक्षण, मला मरू द्या’, ‘मला सहन होत नाही,’ अशी आरडाओरड करीत होता. कार्यकर्त्यांनी त्याला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

या प्रकाराची माहिती समजताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी पुलाकडे धाव घेतली. नवनाथ कारंडे याला घेऊन ते करवीर पोलीस ठाण्यात आले. याठिकाणी पोलीस अधीक्षक डॉ. देशमुखही पाठोपाठ आले. त्यांनी कारंडे याच्याकडे चौकशी केली असता माझे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या जागी मला नोकरी मिळेल, अशी आशा होती. मी दिव्यांग असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेकवेळा नोकरीसाठी अर्ज केला. उपोषणही केले; परंतु मला नोकरी मिळाली नाही. आपली कोणीच दखल घेत नसल्याच्या नैराश्येतून उडी मारण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. डॉ. देशमुख यांनी त्याला दिलासा देत त्याचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. नवनाथ विवाहित असून, त्याला एक मुलगी आहे. याबाबत करवीरपोलीस ठाण्यात नोंद झालीआहे.साहेब, तुम्हाला शपथ आहे...आत्महत्येपासून परावर्तित केल्यानंतरही काही न ऐकण्याच्या स्थितीत असणाºया नवनाथला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यावेळी मराठाबांधवांनी त्याला मारू नका, तुम्हाला मराठा समाजाची शपथ असे पोलिसांना सांगितले. त्यावेळी एका पोलिसाने ‘भावांनो, मी पण मराठा आहे. नवनाथला हात न लावता त्याला सुखरूप घरी पोहोचवतो,’ असे सांगितले.