शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

‘सीईओं’च्या कारवाईचे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ‘स्थायी’मध्ये पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 10:45 AM

ठेकेदार सदस्यांनी आपल्या कामाच्या फाईल्स स्वत:च आणून सह्या घेण्याचा सपाटा लावल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी घेतलेल्या संबंधित कर्मचाऱ्याच्या निलंबनाच्या निर्णयाचे पडसाद जिल्हा परिषदेच्या बुधवारी (दि. २०) झालेल्या स्थायी सभेमध्ये उमटले.

ठळक मुद्दे‘सीईओं’च्या कारवाईचे ‘स्थायी’मध्ये पडसादभोगण यांनी केली बदनामी झाल्याची तक्रार

कोल्हापूर : ठेकेदार सदस्यांनी आपल्या कामाच्या फाईल्स स्वत:च आणून सह्या घेण्याचा सपाटा लावल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी घेतलेल्या संबंधित कर्मचाऱ्याच्या निलंबनाच्या निर्णयाचे पडसाद जिल्हा परिषदेच्या बुधवारी (दि. २०) झालेल्या स्थायी सभेमध्ये उमटले.अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या सभेसाठी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडक र, अरुण इंगवले, जयवंतराव शिंपी, युवराज पाटील, कल्लाप्पाणा भोगण, राजवर्धन निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी अरुण इंगवले आणि प्रवीण यादव यांच्या महामंडळावर निवडी झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.बैठकीमध्ये भोगण यांनीच हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, आचारसंहिता लागणार असल्याने हे काम झाले नाही तर त्या गावाने लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मी स्वत: या कामाची फाईल घेऊन आलो होतो; परंतु त्यामागील पार्श्वभूमी न पाहता संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले. या प्रकरणामध्ये आमची नाहक बदनामी झाली. यावेळी सर्वच सदस्यांनी भोगण यांची बाजू घेतल्यावर सीईओ मित्तल यांनी वारंवार सूचना देऊनही हे प्रकार वाढू लागल्याने आपणी तशी भूमिका घेतल्याचे सांगितले.यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याबाबतच्या अहवालावरही यावेळी चर्चा झाली. यावर अजूनही शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांची सही झालेली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात स्थायी समितीची बैठक घेऊन त्यामध्ये अहवाल मांडण्याच्या सूचना अध्यक्षा महाडिक यांनी दिल्या.बांधकाम विभागाच्या फाईल्स तीन-तीन वेळा पाच-सहा टेबल्स फिरून सीईओंकडे येतात. या प्रक्रियेमुळे कर्मचारी आजारी पडत आहेत. यातील काही टेबल्सची संख्या कमी करता येते का, याचा विचार करावा अशी सूचना राजवर्धन निंबाळकर यांनी केली.

आरोग्य सभापती, आरोग्याधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव‘आळते येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोल्हापुरात अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी म्हणून तुम्ही कधी आणि का आणले, तुमची सोय बघता काय?’ अशी विचारणा सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांना केली. यावर साळे यांनी, ‘वाटल्यास त्यांना परत पाठवितो,’ असे उत्तर दिले. यावेळी ज्येष्ठ सदस्य जयवंतराव शिंपी यांनी आरोग्य सभापती आणि आरोग्याधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचे हे उदाहरण आहे. या चर्चा करायचे हे ठिकाण आहे का, अशी विचारणा केली.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर