लक्ष्मीपुरीतील चार कॅसिनो खेळगृह सील, करमणूक कर विभागाची कारवाई
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: April 3, 2024 21:39 IST2024-04-03T21:39:15+5:302024-04-03T21:39:24+5:30
कोल्हापूर : लक्ष्मीपुरी येथील मुनिसुव्रत प्लाझा या इमारतीमधील तळ मजल्यावर विनापरवाना सुरु असलेले चार ऑनलाईन कॅसिनो खेळगृह बुधवारी करमणूक ...

लक्ष्मीपुरीतील चार कॅसिनो खेळगृह सील, करमणूक कर विभागाची कारवाई
कोल्हापूर: लक्ष्मीपुरी येथील मुनिसुव्रत प्लाझा या इमारतीमधील तळ मजल्यावर विनापरवाना सुरु असलेले चार ऑनलाईन कॅसिनो खेळगृह बुधवारी करमणूक कर विभागाने सील केले.
लक्ष्मीपुरीतील मुनिसुव्रत प्लाझा या इमारतीमधील तळ मजल्यावर विनापरवाना खेळगृह सुरु असल्याची माहिती करमणूक कर विभागाला मिळाली हाेती. मदन कुलकर्णी (अरिहंत प्लाझा), समर्थ पाटील ( बाचणी,ता.कागल) यांचा महादेव ऑनलाईन गेम, रोहीत म्हेतर (रा. बोरिवडे, ता. पन्हाळा )यांचा श्री एंटरप्रायझेस ऑनलाईन गेम व लॉटरी तसेच सागर गोरे यांचे ऑनलाईन गोवा कॅसिनो खेळगृह सध्या श्री शैलेश चव्हाण (चिले कॉलनी) यांच्या ऑनलाईन कॅसिनो गेम या खेळगृहाची अचानक तपासणी केली असता संबंधीतांकडे कोणत्याही विभागाचे परवाने नव्हते. हे चारही ऑनलाईन गेमची खेळगृहे परवानगी न घेता बेकायदेशीररित्या सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने ते सीलबंद करण्यात आले.
ही कारवाई करमणूक कर अधिकारी सैपन नदाफ, सहा करमणूक अधिकारी नितीन धापसे पाटील, व करमणूक कर निरीक्षक अनिल शिंदे, राहुल शिंदे, उल्हास कांबळे, प्रकाश जाधव, प्रकाश कुंभार, शैलेश उंडाळे, रामचंद्र गावडे व निलेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.