अव्वाच्या सव्वा भाडे घेणाऱ्या खासगी बसेसवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 06:24 PM2020-11-14T18:24:28+5:302020-11-14T18:25:36+5:30

diwali, travals, traficoffice, kolhapurnews दीपावली सणासाठी खासगी बसेसमधून होणाऱ्या प्रवासासाठी जादा भाडे आकारणी केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी शनिवारी दिला.

Action to be taken against private buses renting Avva Savva | अव्वाच्या सव्वा भाडे घेणाऱ्या खासगी बसेसवर कारवाईचा बडगा

अव्वाच्या सव्वा भाडे घेणाऱ्या खासगी बसेसवर कारवाईचा बडगा

Next
ठळक मुद्देअव्वाच्या सव्वा भाडे घेणाऱ्या खासगी बसेसवर कारवाईचा बडगाडॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी दिला इशारा

कोल्हापूर : दीपावली सणासाठी खासगी बसेसमधून होणाऱ्या प्रवासासाठी जादा भाडे आकारणी केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी शनिवारी दिला.

दीपावली झाल्यानंतर एक डिसेंबरपर्यंत मूळ गावी अथवा नोकरीच्या ठिकाणी परत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असते. त्याचा फायदा घेत खासगी बसचालक प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. ही बाब ध्यानी घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहनप्रकारानुसार परिवहन महामंडळाच्या बसेसच्या भाडे आकारणीच्या दीडपटपर्यंत भाडे खासगी बसेसद्वारा आकारले जाऊ शकते.

त्यापेक्षा जादा भाडे आकारणी केल्यास तक्रारकर्त्याने आपले नाव, मोबाईल क्रमांक, प्रवासाचा दिनांक, तिकीट, वाहनाचा प्रकार, ट्रॅव्हल्सचे नाव, इत्यादी माहितीसह mahatranscom.in  या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अल्वारिस यांनी केले आहे.
 

Web Title: Action to be taken against private buses renting Avva Savva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.