बाजारभोगाव येथे विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:16 IST2021-06-29T04:16:39+5:302021-06-29T04:16:39+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात जिल्हा निर्बंध घालण्यात आले आहे. ...

Action against unwarranted wanderers at Bazarbhogaon | बाजारभोगाव येथे विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

बाजारभोगाव येथे विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात जिल्हा निर्बंध घालण्यात आले आहे. तरीसुद्धा काही तरुण अनावश्यकपणे रस्त्यावर वाहनाने फेरफटका मारत असल्याने पोलिसांनी बाजारभोगावच्या बाजारपेठेत कारवाई केली. ट्रिपल शीट फिरणे, लायसन्स नसणे, तसेच विनामास्क फिरणे अशा १८ वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली. तसेच चार हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई कळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. या कारवाईत पो. कॉ. निवास कांबळे, वाहतूक पो. कॉ. सुरेश पवार यांच्यासह होमगार्ड सहभागी होते.

Web Title: Action against unwarranted wanderers at Bazarbhogaon