पानटपरी विक्रेत्यांवर कारवाई, ८ हजाराचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 06:54 PM2021-01-06T18:54:08+5:302021-01-06T18:55:00+5:30

Tobacco Ban Kolhapur- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत बुधवारी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन परिसरात कोटपा कायद्यांतर्गत १४ पानटपरी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. या विक्रेत्यांकडून ८ हजार ३५० रुपये दंडवसुल करण्यात आला.

Action against Pantpari sellers, fine of Rs 8,000 recovered | पानटपरी विक्रेत्यांवर कारवाई, ८ हजाराचा दंड वसूल

 बुधवारी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन परिसरात कोटपा कायद्यांतर्गत पानटपरी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

googlenewsNext
ठळक मुद्देपानटपरी विक्रेत्यांवर कारवाई८ हजाराचा दंड वसूल

कोल्हापूर : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत बुधवारी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन परिसरात कोटपा कायद्यांतर्गत १४ पानटपरी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. या विक्रेत्यांकडून ८ हजार ३५० रुपये दंडवसुल करण्यात आला.

ही कारवाई अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक एस.एम.राऊत, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे होमगार्ड ए.बी. पाचाकटे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे महेंद्र मासाळ, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे प्रभारी जिल्हा सल्लागार चारूशीला कणसे, सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या मोहिमेसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांचे मार्गदर्शन लाभले.
 

Web Title: Action against Pantpari sellers, fine of Rs 8,000 recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.