नियमांचे उल्लंघन ६५८ वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 10:29 AM2021-02-01T10:29:40+5:302021-02-01T10:31:52+5:30

Rto Kolhapur- सीटबेल्टचा वापर न करणे, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, विनापरवाना वाहन चालवणे असे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५८ वाहनचालकांवर रविवारी शहर वाहतूक नियंत्रण विभागाने कारवाई केली. रविवारी दिवसभर शहरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

Action against 658 drivers for violating rules | नियमांचे उल्लंघन ६५८ वाहनचालकांवर कारवाई

नियमांचे उल्लंघन ६५८ वाहनचालकांवर कारवाई

Next
ठळक मुद्दे दिवसभरात वाहतुक शाखेचा बडगा महिनाभर विशेष मोहीम सुरुच राहणार

कोल्हापूर : सीटबेल्टचा वापर न करणे, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, विनापरवाना वाहन चालवणे असे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५८ वाहनचालकांवर रविवारी शहर वाहतूक नियंत्रण विभागाने कारवाई केली. रविवारी दिवसभर शहरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी विशेष मोहीम राबवली. वाहनचालकांवर दंडाचा बडगा उगारल्याशिवाय ते वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दिनांक १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२१ अशी एक महिना ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

रविवारी दिवसभर केलेल्या कारवाईत सिग्नलचे उल्लंघन करणाऱ्या ३३ वाहनचालकांकडून, सीटबेल्ट न वापरणाऱ्या २२६ कारचालकांकडून तसेच विविध नियमांचा भंग करणाऱ्या अन्य ३९९ अशा एकूण ६५८ वाहनचालकांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. यावेळी काही वाहनचालकांनी ई-चलन भरण्यास मुदत मागितली. वाहतूक शाखेच्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरात ही मोहीम राबवली.

Web Title: Action against 658 drivers for violating rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.