मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ३७ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:22 IST2021-05-22T04:22:48+5:302021-05-22T04:22:48+5:30

कोरोनाची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केला; पण गारगोटी शहरात लोक बिनधास्त विनामास्क मॉर्निंग वॉक करत आहेत. पोलिसांनी ...

Action against 37 people going for morning walk | मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ३७ जणांवर कारवाई

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ३७ जणांवर कारवाई

कोरोनाची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केला; पण गारगोटी शहरात लोक बिनधास्त विनामास्क मॉर्निंग वॉक करत आहेत. पोलिसांनी अनेकवेळा स्पीकरवरून आवाहन करूनदेखील लोक बिनधास्त वावरत असतात म्हणून शुक्रवारी पहाटे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार केली. यामध्ये गारगोटी शहर व परिसरात मॉर्निंग वॉक करणारे १२ महिला व २८ पुरुष अशा एकूण ४० जण आढळून आले. या सर्वांना भुदरगड पोलीस ठाण्यात आणून दोन तास थांबविले व प्रत्येकाकडून पाचशे रुपये दंड वसूल केला.

फोटो : २१ गारगोटी मॉर्निंग वॉक

ओळ

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले.

Web Title: Action against 37 people going for morning walk