नियमांच्या उल्लंघनप्रकरणी दोन हजारांवर वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:18 IST2021-06-28T04:18:33+5:302021-06-28T04:18:33+5:30

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या निर्बंधांत जिल्ह्यात रविवारी सुमारे २१९१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांपैकी २९१ वाहने जप्त केली, तर ...

Action against 2,000 vehicles for violating rules | नियमांच्या उल्लंघनप्रकरणी दोन हजारांवर वाहनांवर कारवाई

नियमांच्या उल्लंघनप्रकरणी दोन हजारांवर वाहनांवर कारवाई

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या निर्बंधांत जिल्ह्यात रविवारी सुमारे २१९१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांपैकी २९१ वाहने जप्त केली, तर उर्वरित वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून दोन लाख ८६ हजार ८०० रुपये रुपये दंड वसूल केला. कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने ही कारवाई केली.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जिल्ह्यात कारवाई करण्यात येत आहे. रविवारी सुमारे १९०० वाहनांवर मोटर व्हेईकल ॲक्टप्रमाणे गुन्हे नोंदविले, त्याद्वारे सुमारे दोन लाख ८६ हजार ८०० रुपये दंड वसूल केला. विनामास्क फिरणाऱ्या १७०३ जणांकडून दोन लाख ७६ हजार ८०० रुपये दंड वसूल केला; तर निर्धारित वेळेपेक्षा जादा वेळ आस्थापना सुरू ठेवल्याबद्दल ६२ आस्थापनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे ४३ हजार १०० रुपये दंड वसूल केला.

Web Title: Action against 2,000 vehicles for violating rules