दिवसभरात १७५३ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:16 IST2021-06-10T04:16:54+5:302021-06-10T04:16:54+5:30

कोल्हापूर : कोरोनाचे निर्बंध शिथिल केले असले तरीही उल्लंघन करणा-यांविरोधात कारवाई सुरू आहे. कोल्हापूर पोलीस दलातर्फे बुधवारी दिवसभरात १७५३ ...

Action on 1753 vehicles during the day | दिवसभरात १७५३ वाहनांवर कारवाई

दिवसभरात १७५३ वाहनांवर कारवाई

कोल्हापूर : कोरोनाचे निर्बंध शिथिल केले असले तरीही उल्लंघन करणा-यांविरोधात कारवाई सुरू आहे. कोल्हापूर पोलीस दलातर्फे बुधवारी दिवसभरात १७५३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. तर सुमारे तीन लाख रुपये दंड वसूल केला.

कोरोना महामारीचा कहर अद्याप कायम आहे, पण निर्बंध शिथिल केले असले तरीही पोलीस दलातर्फे कारवाई जोमात सुरू आहे. दिवसभरात विनामास्क फिरणा-या ३३० जणांवर कारवाई केली, त्यांच्याकडून ५७ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. तर १७२० वाहनांवर मोटर व्हेईकल ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून २ लाख १९ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर त्याव्यतिरिक्त ३३ वाहने जप्त केली. निर्बंधांचे उल्लंघन करून अस्थापना सुरू ठेवल्याबद्दल जिल्ह्यातील ३६ आस्थापनाधारकांवर दंडात्मक करवाई केली. त्यांच्याकडून एकूण २६ हजार ६०० रुपये दंड वसूल केला.

Web Title: Action on 1753 vehicles during the day