शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी देवस्थानच्या ३२५ गुंठे जमिनीचे संपादन, समितीने मागितली नुकसान भरपाई 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: January 23, 2023 13:12 IST

ही रक्कम नेमकी कोणाला द्यायची हा पेच

इंदुमती गणेशकोल्हापूर : बहुचर्चित नागपूर-रत्नागिरीमहामार्गासाठी सुरू असलेल्या चोकाक ते आंबा येथील भूसंपादनात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारीतील १३२ मंदिरांची ३२५ गुंठे जमीन संपादित होणार आहे. त्यासाठी देवस्थान समितीने भूसंपादन विभागाला रीतसर पत्र पाठवून नुकसानभरपाई मागितली असून ही रक्कम १५ कोटी ७९ लाख इतकी आहे. ही रक्कम आता कसणाऱ्या शेतकऱ्याला द्यायची की देवस्थान समितीला हा पेच आहे.नागपूर-रत्नागिरीमहामार्गासाठी सध्या चोकाक ते आंबा येथील भूसंपादन वेगाने सुरू असून, त्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यादेखील जमिनींचा समावेश आहे. त्यामुळे मागील आठवड्यात देवस्थान समितीने भूसंपादन विभागाला पत्र पाठवून नुकसानभरपाई मागितली आहे. त्यात देवस्थाने व गावांची नावे दिली आहेत, पण गट नंबर दिले नव्हते. त्यामुळे भूसंपादन विभागाने सातबारा व गटनिहाय जमिनींची माहिती गोळा केली आहे. त्यानुसार समितीची ३२५ गुंठे जमीन संपादित होणार आहे. त्यासाठी काढलेली नुकसानभरपाईची रक्कम तब्बल १५ कोटी ७९ लाख इतकी आहे.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या हजारो एकर जमिनी असल्या तरी त्या लागणदार व वहिवाटदारांकडे आहेत. देवस्थानला कुळ कायदा लागू होत नाही. जमीन संपादित केल्याने देवस्थान आणि शेतकरी दोघांचेही नुकसान होणार आहे. त्यामुळे दोघांनी नुकसानभरपाई मागितली असून आता नेमकी रक्कम कुणाला द्यायची व किती द्यायची यावर चर्चा सुरू आहे.

२००६ चा निर्णयभूसंपादन विभाग जिल्हा प्रशासनाअंतर्गत आहे आणि देवस्थान समितीचे प्रशासक जिल्हाधिकारी आहेत. रक्कम देवस्थानला द्यायची की शेतकऱ्यांना यावर मार्ग काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने देवस्थानांच्या प्रकरणात दिलेला निकाल तसेच २००६ सालच्या शासन निर्णयाचा आधार घेतला जाणार असून कायद्यात बसेल त्या पद्धतीने नुकसानभरपाई दिली जाईल.

कमीतकमी पावणेतीन लाख दरराष्ट्रीय महामार्गासाठी केल्या जाणाऱ्या भूसंपादनासाठी गुंठ्याला कमीत कमी अडीच ते पावणेतीन लाख रुपये दर देण्यात आला आहे. शेती, बिगर शेती, महामार्गालगतची जमीन अशा प्रकारानुसार दर ठरविण्यात आले आहेत.

एजंटांना बळी पडू नकाभूसंपादनासाठी चांगला दर मिळाल्याने त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळाला आहे. पण अनेक शेतकरी, खातेदार एजंटांना बळी पडत आहेत. भूसंपादन विभागाचे नाव सांगून शेतकऱ्यांकडून पैसे वसूल केले जात आहेत. तरी नागरिकांनी या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये असे आवाहन विभागाने केले आहे.

तालुकानिहाय देवस्थानच्या मंदिरांची यादी

  • हातकणंगले : २० गट
  • शाहूवाडी : ६० गट
  • करवीर : २१ गट
  • पन्हाळा : ३१ गट
टॅग्स :kolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरीnagpurनागपूरhighwayमहामार्ग