शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पाचशेच्या बनावट नोटा जमा केलेले खाते नवी मुंबईकराचे, चौकशीसाठी बोलवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 15:09 IST

सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी

कोल्हापूर : आयसीआयसीआय बँकेच्या राजाराम रोड येथील एटीएम सेंटरमध्ये अज्ञाताने डिपॉझिट मशीनद्वारे ५०० रुपयांच्या २० बनावट नोटा भरल्या होत्या. बनावट नोटा जमा केलेले खाते नवी मुंबईतील व्यक्तीचे असून, त्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले आहे. एटीएम सेंटरसह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.राजाराम रोड येथील वसंत प्लाझामध्ये ग्राउंड फ्लोअरला असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये २८ मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास एका व्यक्तीने बनावट नोटा जमा केल्या होत्या. हा प्रकार दुसऱ्या दिवशी बँकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यावरून अधिकाऱ्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. बनावट नोटा जमा झालेले खाते नवी मुंबईतील व्यक्तीचे असल्याची माहिती तपासात समोर आली.त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी संबंधित खातेदाराला चौकशीसाठी बोलवले आहे. दोन दिवसात तो कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, एटीएम सेंटरसह आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. पैसे जमा केल्यानंतर संबंधित व्यक्ती कुठे गेली, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. आठवडाभरात या गुन्ह्याचा उलगडा होईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.बनावट नोटांचे रॅकेट सक्रियआजपर्यंत काही व्यक्तींद्वारे बनावट नोटा चलनात आणल्या जात होत्या. आता यासाठी डिपॉझिट मशीनचा वापर झाल्याने बँकांची चिंता वाढली आहे. या घटनेच्या निमित्ताने बनावट नोटा तयार करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्याची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

स्वीकारल्यानंतरच नोटांची ओळखखराब किंवा जीर्ण झालेल्या नोटा न स्वीकारणारे डिपॉझिट मशीन बनावट नोटा स्वीकारते. त्यानंतर तपासणी होऊन मशीनमधील स्वतंत्र बास्केटमध्ये बनावट नोटा जमा होतात. त्यामुळे स्वीकारण्यापूर्वी बनावट नोटांची ओळख स्पष्ट होत नाही, अशी माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस