अपघातातील जखमीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:26 IST2021-08-15T04:26:02+5:302021-08-15T04:26:02+5:30
नवे पारगाव : नवे पारगाव (ता.हातकणंगले) येथील पांडुरंग तुकाराम जाधव (वय ६२) बुधवारी (दि.११) इस्लामपूर येथील आरआयटी कॉलेजजवळ अपघात ...

अपघातातील जखमीचा मृत्यू
नवे पारगाव : नवे पारगाव (ता.हातकणंगले) येथील पांडुरंग तुकाराम जाधव (वय ६२) बुधवारी (दि.११) इस्लामपूर येथील आरआयटी कॉलेजजवळ अपघात होऊन गंभीर जखमी झाले होते.त्यांचा आज शनिवारी कराडच्या कृष्णा चॅरिटेबलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पांडुरंग जाधव हे बुधवारी पीयूष (वय १२) या नातीला भेटण्यासाठी बहे - बोरगावला मोटरसायकलवरून जात होते. इस्लामपूर येथील आरआयटी कॉलेजजवळ अज्ञात सायकलस्वार एकदम आडवा आल्याने त्यांनी ब्रेक लावला. त्यावेळी ते रस्त्यावर कोसळल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना कराडच्या कृष्णा चॅरिटेबल मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मुंबई येथील विक्रीकर निरीक्षक पूनम जाधव - निकम यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (दि.१६) आहे.
फोटो: पांडुरंग जाधव