शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

नवरात्रौत्सव तयारीला वेग : अंबाबाई मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 6:04 PM

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख देवता करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनवरात्रौत्सव तयारीला वेग : अंबाबाई मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटीजोतिबा मंदिर परिसरातही विविध कामांचा प्रारंभ

कोल्हापूर : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख देवता करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी करण्यात येत आहे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे जरी बंद ठेवण्यात आली तरी त्या-त्या देवतांची नित्यनियमाने होणारी पूजाअर्चा सुरूच आहे. यंदाचा नवरात्रौत्सव अवघ्या अठरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याची तयारी म्हणून करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराची स्वच्छता व रंगरंगोटी केली जात आहे. त्यात चारही दरवाजे आणि आतील लोखंडी ग्रीलचे दरवाज्यांचेही रंगकाम करण्यात आले आहे.

यंदा जरी भक्तांची हजेरी नसली तरी या नऊ दिवसांमध्ये प्रथेप्रमाणे देवीची विविध रूपांतील सालंकृत पूजा बांधली जाणार आहे. याशिवाय परंपरेप्रमाणे नित्यविधीही मंदिराच्या आवारात केले जाणार आहेत, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.देवस्थान समितीच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या केदारलिंग जोतिबा देवस्थान वाडी रत्नागिरी येथे देवस्थान समितीमार्फत काळभैरव मंदिर पुनर्बांधणी, दीपमाळ दुरूस्ती, मंदिर आवारातील पाणी निचरा व फरशीची दुरुस्ती या कामांचा प्रारंभ सोमवारी समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, राजाराम गरुड, सचिव विजय पोवार, कनिष्ठ अभियंता सुयश पाटील, महादेव दिंडे, प्रकल्प वास्तू विशारद राजेंद्र सावंत, सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजी सांगळे यांच्यासह पुजारी आणि देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :Navratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर