शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भूपाल शेटे-संजय भोसले यांच्यात शिवीगाळ; कोल्हापूर महापालिका जनसंपर्क कार्यालयात घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:54 IST

कोल्हापूर : माजी उपमहापौर भूपाल शेटे आणि महानगरपालिकेचे निलंबित अधिकारी संजय भोसले यांच्यातील घरफाळा घोटाळ्यावरून सुरू असणारी कायदेशीर लढाई ...

कोल्हापूर : माजी उपमहापौर भूपाल शेटे आणि महानगरपालिकेचे निलंबित अधिकारी संजय भोसले यांच्यातील घरफाळा घोटाळ्यावरून सुरू असणारी कायदेशीर लढाई सोमवारी हमरीतुमरीपर्यंत पोहोचली. खुर्चीवर बसण्यावरून या दोघांत तुफान शिवीगाळ झाली. एकमेकांना दमबाजी करण्यामुळे महानगरपालिकेत काही वेळासाठी गोंधळ उडाला.माजी उपमहापौर शेटे सोमवारी महापालिकेत प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन देण्यासाठी आले होते. निवेदन देऊन ते परतत असताना जनसंपर्क कार्यालयात गेले. तेथे असलेल्या एका खुर्चीत ते बसले. पत्रकारांना निवेदन देत असतानाच त्या ठिकाणी निलंबित अधिकारी संजय भोसले आले. भोसले यांनी शेटे यांना खुर्चीतून उठण्याची सूचना केली. या खुर्चीत भोसले रोज बसत असतात. त्यामुळे शेटे त्या खुर्चीतून उठले, पण उठत असताना हे जनसंपर्क कार्यालय आहे, इथे कोणीही बसू शकतो, येऊ शकतो, असे म्हणताच भोसले यांचा राग अनावर झाला.भोसले यांनी शेटे यांचा अपमान होईल असे शब्द वापरले. त्यावरून वाद सुरू झाला. शेटे यांनीही त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. परंतु, भोसले यांचा पारा भलताच चढला होता, त्यांनी थेट शिवीगाळ सुरू केली. दोघांमधील हा वाद मोठ्या आवाजात सुरू झाल्याने महापालिकेत एकच गोंधळ उडाला. अनेक कर्मचारी जनसंपर्क कार्यालयासमोर गोळा झाले. शेवटी या वादात पत्रकारांनी हस्तक्षेप करत शेटे यांना जनसंपर्क कार्यालयातून बाहेर आणले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर