...तर जिल्ह्यातील कसेबसे दहा टक्केच कारखाने सुरू होतील; औद्योगिक क्षेत्रात साशंकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 10:57 AM2020-04-14T10:57:08+5:302020-04-14T11:00:49+5:30

कामगारांना रोजगार मिळावा, बाजारपेठ सुरू राहावी, कराच्या माध्यमातून सरकारला उत्पन्न मिळावे अशा उद्दात हेतूने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्याचा सरकारचा उद्देश चांगला आहे. मात्र, या तत्त्व आणि नियमांनुसार कितपत कारखाने सुरू होतील याबाबत साशंकता वाटते, अशी प्रतिक्रिया ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील यांनी व्यक्त केली.

 ... About ten percent of the factory will be started in the district | ...तर जिल्ह्यातील कसेबसे दहा टक्केच कारखाने सुरू होतील; औद्योगिक क्षेत्रात साशंकता

...तर जिल्ह्यातील कसेबसे दहा टक्केच कारखाने सुरू होतील; औद्योगिक क्षेत्रात साशंकता

Next
ठळक मुद्दे लघु व मध्यम उद्योगांसमोर प्रश्न

संतोष मिठारी

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या नियमानुसार कार्यवाही झाली तर कोल्हापूर जिल्ह्यातील कसेबसे दहा टक्केच कारखाने सुरू होतील, अशी प्रतिक्रिया उद्योजकांतून सोमवारी व्यक्त झाली. कामगारांची निवास, ने-आण करण्याची व्यवस्था सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना परवडणारी नसल्याने कारखाने सुरू करण्याचा या उद्योगांसमोर प्रश्न आहे.

कोरोनाबाबत कोल्हापूर हे आॅरेंज झोनमध्ये आहे. केंद्र सरकारने देशातील उद्योग, कारखाने सुरू करण्याबाबत काही नियमावली तयार केली आहे. त्यात सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, कामगारांची निवास व जेवणाची व्यवस्था, आदींचा समावेश आहे. ही नियमावली पाहता निर्यात करणाऱ्या, मोठ्या युनिटस्लाच या नियमांनुसार व्यवस्था करणे शक्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये अशी व्यवस्था करू शकणाºया कारखान्यांचे प्रमाण साधारणत: दहा टक्क्यांपर्यंत असल्याचे कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.

कामगारांना रोजगार मिळावा, बाजारपेठ सुरू राहावी, कराच्या माध्यमातून सरकारला उत्पन्न मिळावे अशा उद्दात हेतूने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्याचा सरकारचा उद्देश चांगला आहे. मात्र, या तत्त्व आणि नियमांनुसार कितपत कारखाने सुरू होतील याबाबत साशंकता वाटते, अशी प्रतिक्रिया ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील यांनी व्यक्त केली. उद्योग, कारखाने सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे आल्यानंतर निर्णय घेतला येईल. सद्य:स्थिती आणि केंद्र सरकारची नियमावली पाहता सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, कारखाने सुरू करता येणार नसल्याचे वास्तव आहे. येत्या दोन दिवसांत राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होणे अपेक्षित असल्याचे ‘गोशिमा’चे अध्यक्ष सचिन शिरगावकर यांनी सांगितले.

कामगार, कच्चा माल, मागणीवर अवलंबून
नियमावलीप्रमाणे कारखाने सुरू करण्यास परवानगी मिळणार हे चांगले आहे. मात्र, कामगारांची उपस्थिती, कच्च्या मालाचा पुरवठा, ग्राहकांची मागणी यावर कारखाने सुरू होणे अधिकतर अवलंबून आहे. कारखाने जरी सुरू झाले, तरी यंत्राची साफसफाई आणि लॉकडाऊनपूर्वी हाती घेतलेले काम पूर्ण करण्याला प्राधान्य राहणार असल्याचे ‘मॅक’चे अध्यक्ष गोरख माळी यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्याचे औद्योगिक क्षेत्र दृष्टिक्षेपात
* सूक्ष्म, लघू, मध्यम आणि मोठ्या उद्योगांची संख्या : ४५ हजार
*निर्यात करणाºया उद्योगांची संख्या : सुमारे २०
* मोठ्या औद्योगिक वसाहतींची संख्या : सात
* कामगारांची संख्या : सुमारे दीड लाख
 

 

Web Title:  ... About ten percent of the factory will be started in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.