सिंधुदुर्गात एकाच दिवशी आढळले तब्बल ५० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST2020-12-05T04:57:25+5:302020-12-05T04:57:25+5:30
सिंधुदुर्गनगरी : दीड महिन्यांच्या कालावधीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच दिवशी कोरोनाचे तब्बल ५० रुग्ण मिळाले. त्यामुळे रुग्णसंख्या ५३५२ वर पोहोचली ...

सिंधुदुर्गात एकाच दिवशी आढळले तब्बल ५० रुग्ण
सिंधुदुर्गनगरी : दीड महिन्यांच्या कालावधीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच दिवशी कोरोनाचे तब्बल ५० रुग्ण मिळाले. त्यामुळे रुग्णसंख्या ५३५२ वर पोहोचली आहे. सक्रिय रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होत असून, सध्या २५७ रुग्ण विविध कोविड सेेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
गुरुवारी १३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ४९४४ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून रुग्णसंख्या घटत होती. दररोज रुग्णसंख्या कमी कमी होत होती. सरासरी २५ ते ३० रुग्ण मिळत होते. गुरुवारी मात्र एकाच वेळेस ५० रुग्ण मिळाल्याने पुन्हा रुग्णसंख्या वाढतेय की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण
देवगड - ३७५, दोडामार्ग - २८०, कणकवली - १६३९, कुडाळ - १२०२ , मालवण - ४४६, सावंतवाडी - ७५६ , वैभववाडी - १४९, वेंगुर्ला - ४९२. जिल्ह्याबाहेरील रुग्ण - १३
तालुकानिहाय सक्रिय रुग्ण
देवगड - ३३, दोडामार्ग - १८, कणकवली - ५३, कुडाळ - ४९, मालवण - ८, सावंतवाडी - ६१, वैभववाडी - ५, वेंगुर्ला - ३०.