शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अभिजित बिचुकलेची कारागृहात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 05:34 IST

खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोचा स्पर्धक अभिजित बिचुकले याची कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रवानगी केली.

कोल्हापूर : धनादेश बाऊन्स प्रकरणी जामीन मिळालेल्या व २०१२ मधील खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोचा स्पर्धक अभिजित बिचुकले याची कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रवानगी केली. कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी त्याला दुजोरा दिला.बिचुकले याचा शनिवारी पहाटे रक्तदाब वाढल्याने त्याला उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची तपासणी करून त्याची प्रकृती ठिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर सकाळी ११ वाजता त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने बिचुकलेला धनादेश बाऊन्स प्रकरणात जामीन मंजूर केला.परंतु, २०१२ मध्ये फिरोज पठाण यांच्याकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणातही बिचुकले हा न्यायालयीन कामकाजात हजर राहत नव्हता. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला. अभिजित बिचुकलेवर आणखी काही गुन्हे आहेत का?याची पडताळणी केली असता खंडणी प्रकरणात त्याला वॉरंट बजावले असल्याचे समोर आले. त्यामुळेच त्याची रवानगीसातारा जिल्हा रुग्णालयातील कोठडीत करण्यात आलीहोती.खटल्याची पुढील सुनावणी २७ जूनला होणार असून,डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो तंदरुस्त असल्याचे सांगितले.

टॅग्स :abhijeet bichukaleअभिजीत बिचुकलेjailतुरुंगBigg Boss Marathiबिग बॉस मराठी