संक्षीप्त.. क्राईम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:23 IST2021-01-08T05:23:26+5:302021-01-08T05:23:26+5:30
कोल्हापूर : राजेंद्रनगरातील घरातून सुमारे ८० हजारांची सोन्याची चेन चोरून नेल्याची तक्रार विक्रांत बापूराव रावराणे (वय ३७ रा. रेव्हिन्यू ...

संक्षीप्त.. क्राईम
कोल्हापूर : राजेंद्रनगरातील घरातून सुमारे ८० हजारांची सोन्याची चेन चोरून नेल्याची तक्रार विक्रांत बापूराव रावराणे (वय ३७ रा. रेव्हिन्यू को-ऑप सोसायटी, राजेंद्रनगर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी योगेश महादेव पोवार (वय ३२), तेजस अशोक कांबळे (२८, दोघेही रा. पेठवडगाव), राजेशकुमार श्रीराम सहानी (३७, रा. मणेरमाळ, उचगाव) या तिघा संशयितांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
कारटेप चोरी
कोल्हापूर : बाबा जरगनगर येथे दारात उभ्या केलेल्या चारचाकी वाहनातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन हजार रुपये किमतीच्या कारटेपची चोरी केली. याबाबत समीर सदाशिव लोकरे ( वय ४२, रा. बाबा जरगनगर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
दोन दुचाकींची चोरी
कोल्हापूर : शहरातील भवानी मंडप आणि जाधववाडीतून दुचाकी चोरी झाल्याच्या जुना राजवाडा व शाहुपूरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या. दीपक आनंदा पाटील ( वय ३३, रा. उपवडे, ता. करवीर) यांनी भवानी मंडपातील भवानी चेंबरनजीक दुचाकी उभी केली. ती अज्ञाताने चोरुन नेली, तर जाधववाडीतील मनोहर भगवान नलवडे (वय ४२) यांनी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे उभी केलेली दुचाकी अज्ञाताने चोरली.