संक्षीप्त.. क्राईम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:15 IST2021-01-08T05:15:37+5:302021-01-08T05:15:37+5:30
कोल्हापूर : कुत्रे आडवे आल्याने भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. पंचशील विजय कोलप (वय ४५), विजय ...

संक्षीप्त.. क्राईम
कोल्हापूर : कुत्रे आडवे आल्याने भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. पंचशील विजय कोलप (वय ४५), विजय आनंदा कोलप (५०, दोघेही रा. कोरोची, ता. हातकणंगले) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना बुधवारी सकाळी महामार्गावर कोरोची (ता. हातकणंगले) येथे घडली. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.
सायकलवरून पडून १२ वर्षाचा मुलगा जखमी
कोल्हापूर : बानगे (ता. कागल) येथे एसटी स्टॅंडवर सायकलवरून पडल्याने बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. सागर राजेश नेमा्ळी (वय १२, रा. शेवडे गल्ली, बानगे, ता. कागल) असे जखमीचे नाव आहे. ही घटना बुधवारी घडली, जखमीवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विषारी द्रव्य पिऊन एकाची आत्महत्या
कोलहापूर : घरगुती कारणावरून विषारी द्रव्य प्राशन केल्याने रुग्णालयात दाखल केलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. उदयकुमार शशिकांत देशपांडे (वय ३८, रा. रुमाले मळा, आर. के. नगर) असे मृताचे नाव आहे. त्याला उपचारासाठी शनिवारी दाखल केले होते. त्याची नोंद सीपीआर चौकीत झाली आहे.