सक्षिप्त... क्राईम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:23 IST2020-12-22T04:23:13+5:302020-12-22T04:23:13+5:30

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील आवळी खुर्द येथील ज्ञानेश्वर आनंदा हळके (वय ३२) यांचा विषारी द्रव्य प्राशन केल्याने मृत्यू ...

Abbreviated ... Crime | सक्षिप्त... क्राईम

सक्षिप्त... क्राईम

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील आवळी खुर्द येथील ज्ञानेश्वर आनंदा हळके (वय ३२) यांचा विषारी द्रव्य प्राशन केल्याने मृत्यू झाला. विष प्राशन केल्याने अत्यवस्थेत त्यांना शुक्रवारी (दि. १८) सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते, सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. भेडसगाव (ता. गडहिंग्लज येथील सुनील भीमराव पाटील (वय ५०) यांनीही राहत्या घरी गुरुवारी विष प्राशन केले होते. सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु असताना सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

दुचाकीस्वार जखमी

कोल्हापूर : फुलेवाडी फायर स्टेशननजीक रस्त्यावर दुचाकी घसरुन पडल्याने तुषार बाबासाहेब संकपाळ (वय २८ रा. हुपरी, ता. हातकणंगले) हे जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी घडली. त्यांना जखमी अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

वृध्द जखमी

कोल्हापूर : कुडित्रे (ता. करवीर) येथे कुभी कासारी साखर कारखान्यानजीक झालेल्या अपघातात विष्णूपंत धोंडूपत करवळेकर (वय ७५, रा. महाद्वार रोड, कोल्हापूर) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

दोघे गंभीर जखमी

कोल्हापूर : येथील मार्केट यार्ड परिसरात रविवारी रात्री उशिरा दुचाकी अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. साताप्पा विष्णू नारकर (वय ३७, रा. नंदगाव, ता. करवीर) व तेजस सीताराम कांबळे (वय ४०, रा. पिंपळगाव खुर्द, ता. राधानगरी) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत शाहुपुरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

(तानाजी)

Web Title: Abbreviated ... Crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.