संक्षीप्त.. क्राईम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:39 IST2020-12-15T04:39:10+5:302020-12-15T04:39:10+5:30

कोल्हापूर : कागलमध्ये अंघोळ करताना बाथरुममध्ये पाय घसरुन पडलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. राघवेंद्र लालचंद गौड (वय २६, ...

Abbreviated .. Crime | संक्षीप्त.. क्राईम

संक्षीप्त.. क्राईम

कोल्हापूर : कागलमध्ये अंघोळ करताना बाथरुममध्ये पाय घसरुन पडलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. राघवेंद्र लालचंद गौड (वय २६, रा. कागल, मूळ गाव- गोरखपूर, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. दि. १२ डिसेंबर रोजी ही घटना घडली. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला.

कीटकनाशक प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

कोल्हापूर : कीटकनाशक प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. महादेव वसंत पाटील (वय ५०, रा. म्हालसवडे, ता. करवीर) असे मृताचे नाव आहे. ही घटना म्हालसवडे येथे त्यांच्या मालकीच्या सोरटे नावाच्या शेतात घडली. शुक्रवारी (दि. ११) त्यांनी कीटकनाशक प्राशन केल्याने त्यांना अत्यवस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

(तानाजी)

Web Title: Abbreviated .. Crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.