शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापूर : गव्याच्या हल्ल्यात अवचितवाडीतील शेतकरी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:00 IST

केळोशी बु॥पैकी आवचितवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात बळवंत भिकाजी जाधव ( वय ५४ ) हे गंभीर जखमी झाले असुन पुढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर मध्ये दाखल केले आहे. या आठवडयातील परिसरातील ही दुसरी घटना असुन शेतकरी वर्गामध्ये कमालीची भिती पसरली आहे.

ठळक मुद्देगव्याच्या हल्ल्यात अवचितवाडीतील शेतकरी गंभीर जखमीपरिसरातील आठवडयातील दुसरी घटना ;वन विभागाची जुजबी कारवाई

श्रीकांत ऱ्हायकरधामोड/कोल्हापूर : केळोशी बु॥पैकी आवचितवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात बळवंत भिकाजी जाधव ( वय ५४ ) हे गंभीर जखमी झाले असुन पुढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर मध्ये दाखल केले आहे. या आठवडयातील परिसरातील ही दुसरी घटना असुन शेतकरी वर्गामध्ये कमालीची भिती पसरली आहे.

सद्या ऊसपिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू आहे . व ऊस पिकात दबा धरून बसलेले हे गवे अचानक हल्ला चढ़वत असल्याने गव्यांचा हल्ल्याचे वाढले आहे. यावरती वनविभागाने ठोस कारवाई करावी अशी मागणी होत असताना, केवळ जुजबी कारवाई करून वेळ मारून नेली जात असल्याचे संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी बोलुन दाखवले.

बळवंत भिकाजी जाधव हे आपल्या ' सुतारकी ' नावाच्या शेतामध्ये ऊसाला पाणी देण्यासाठी ,पाट तयार करण्यासाठी गेले होते . ते पाट खनत असताना पाठीमागुन आलेल्या गव्याने अचानक त्यांचावर हल्ला चढवला. जोराचा धडकेने ते जमिनीवर कोसळले.

कांही कळायच्या आत गव्याने पुन्हा त्यांचावर हल्ला चढवला त्यात त्यांचा डाव्या पायाला जोरदार धडक बसल्याने व शिंगे मांडीत घुसल्याने ते रक्तबंबाळ झाले. त्यात त्यांचा हात व डोक्यालाही गंभीर इजा झाली आहे. ते कसेबसे ऊसातुन बाहेर आले व तेथेच कोसळले. शेजारीच प्राथमिक शाळेच्या क्रिडांगणावर खेळ खेळणाऱ्या तरुणांनी हा प्रकार बघुन आरडा - ओरड करून गावकऱ्यांना जमा केले .व जखमी जाधव यांना पढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर येथे हलवले.पण धक्कादायक बाब अशी की , गेली तिन ते चार दिवस हा गवा याच परिसरात वास्तव्यास असुन व ही बातमी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहीत होती. पण ग्रामस्थांना तशा कोणत्याच सुचना वन विभागाकडून मिळाल्या नव्हत्या व त्या गव्याला तेथुन हुसकावून लावण्या संदर्भातही कोणतीच कारवाई त्यांनी केलेली नाही.

त्याचा कोणताच पत्ता बळवंत जाधव यांना नसल्याने ते आज या शेताकडे गेले व त्या गव्याने त्यांना लक्ष केले. त्यात त्यांना गंभीर इजा झाली आहे. वन विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज परिसरात अशी दुसरी घटना घडली. केवळ या शेतकऱ्यांचे ' दैव बलवत्तर ' म्हणुनच 'जीवावर आलेले दुखापतीवरच निभावले '.सद्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने परिसरातील बहुतांशी पुरुष मंडळी ऊसतोडी करण्यासाठी बाहेरगावी जात असतात व घरातील महिला ऊसांना पाणी देणे, भांगलनीची कामे करण्यासाठी शेताकडे जातात. पण परिसात हा गवा गेली चार दिवस तळ ठोकून असल्याने महिला वर्गात कमालीची भिती पसरली आहे. हा गवा बहुधा बित्तरलेला असावा त्यामुळे तो हा परिसर सोडून जात नाही . त्याला वन विभागाने त्वरीत हुसकावून लावावे. अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे .

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर