‘आप’च्या निधी संकलन मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:23 IST2020-12-29T04:23:00+5:302020-12-29T04:23:00+5:30
कोल्हापूर : आम आदमी पार्टीच्यावतीने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून निधी संकलनाच्या मोहिमेला रविवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी २ हजार ...

‘आप’च्या निधी संकलन मोहीम सुरू
कोल्हापूर : आम आदमी पार्टीच्यावतीने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून निधी संकलनाच्या मोहिमेला रविवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी २ हजार २६९ रुपये जमा झाले.
शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये फिरून, तसेच वेबसाईटच्या माध्यमातून देणग्या स्वीकारल्या जाणार आहेत. शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये फिरून, तसेच वेबसाईटच्या माध्यमातून देणग्या स्वीकारल्या जाणार आहेत.
महापालिका निवडणूक लढविण्यासाठी लागणारे पैसे जनतेतून उभा करणार असल्याचे आम आदमी पार्टीने जाहीर केले आहे. त्यानुसार कोल्हापुरातील बाजारपेठांमध्ये जाऊन छोट्या देणग्याद्वारे पैसे जमा करण्यात येत आहेत. याचा प्रारंभ रविवारी महाद्वार रोड येथील बिनखांबी मंदिर येथून करण्यात आला. निधी संकलन मोहीम महापालिका निवडणूक होईपर्यंत अशीच सुरू राहणार आहे. फोनवरून चार नागरिकांनी सुमारे १४ हजार रुपये देणार असल्याचे ‘आप’चे महापालिका प्रचारप्रमुख संदीप देसाई यांनी सांगितले. यावेळी उत्तम पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, आदम शेख, गिरीश पाटील, पौर्णिमा निंबाळकर, अश्विनी गुरव, राज कोरगावकर, आदी उपस्थित होते.