शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अज्ञात वाहनाची धडक, २५ फूट नेले फरफटत; दुचाकीस्वार तरुणी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 15:51 IST

पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने धडक देऊन २५ फूट फरफटत नेल्याने अपघातात कॉलेज तरुणी ठार झाली. शिवानी संतोष पाटील (वय १९, रा. अंबाई टँक), नवनाथ हाऊसिंग सोसायटी, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. बुधवारी सकाळी हा अपघात झाला. घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिसांत झाली. तरण्याताठ्या मुलीच्या अशा अपघाती निधनाने पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला.पोलिसांनी सांगितले की, केआयटी येेथे पुढील शैक्षणिक प्रवेशाच्या चौकशीसाठी शिवानी सकाळी मोपेडवरून गेली होती. कॉलेज प्रवेश निश्चित करून जीवनाची सुरुवात करण्याची उत्कंठा तिला लागून राहिली होती; परंतु क्रूर नियतीला हे बघवले नाही. कॉलेजमधील काम संपल्यानंतर ती घरी जात होती. गोकुळ शिरगावजवळील सुदर्शन पेट्रोल पंपाजवळ आली असता तिला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात शिवानी मोपेडसह २५ फूट फरफटत गेली.यामध्ये तीच्या डोक्याला मार लागला. अपघाताची माहिती तिच्या मित्रपरिवाराला समजली. त्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी तिला उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. वसंतराव चौगुले पतसंस्थेचे अध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक अनिल पाटील यांची ती नात होती. एस. व्ही. एंटरप्राइजेसचे मालक संतोष अरविंद पाटील यांची ती कन्या होती. रक्षाविसर्जन आज सकाळी आठ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू