शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

तो मला सुखानं जगू देणार नाही, त्यापेक्षा मेलेलं बरं; तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपवले जीवन, कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 13:07 IST

तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कोल्हापूर : बोंद्रेनगर येथील तरुणीने राहत्या घरात लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नकुसा साऊ बोडेकर (वय १९, रा. ओम गणेश मंडळ, बोंद्रेनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. बुधवारी (दि. १५) दुपारी ही घटना घडली. पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली असून, जवळच्याच तरुणाने त्रास दिल्याने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख त्यामध्ये तरुणीने केला आहे.करवीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोंद्रेनगरातील नकुसा बोडेकर या तरुणीचे नववीपर्यंत शिक्षण झाले होते. त्यानंतर ती काही घरांमधील घरकाम करून कुटुंबाला हातभार लावत होती. चार दिवसांपूर्वीच ती गगनगिरी पार्क येथील सावत्र आईच्या घरातून बोंद्रेनगरातील घरी आली होती. बुधवारी दुपारी घरात कोणी नसल्याचे पाहून तिने छताच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिची आई आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक निवास पवार आणि मनीषा नारायणकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात आला. रात्री उशिरा याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.सुसाइड नोट मिळालीआत्महत्या केलेल्या तरुणीच्या हातात पोलिसांना दोन सुसाइड नोट मिळाल्या. मारुती हरी बोडेकर याच्यामुळे मी जीव देत आहे. बोंद्रेनगरात राहायला गेलीस तर मी तुला सोडणार नाही. सापडशील तिथे मारणार, अशी धमकी त्यानं दिली होती. ‘तो मला सुखानं जगू देणार नाही. त्यापेक्षा मेलेलं बरं. त्याच्यामुळंच मी जीव देत आहे. सॉरी आई, नाना. त्याला माफ करू नका,’ असा उल्लेख चठ्ठीत केला आहे.तरच माझ्या आत्म्याला शांती लाभेललाल आणि निळ्या रंगाच्या शाईने तिने दोन चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. लाल रंगाच्या शाईने लिहिलेल्या चिठ्ठीत तिने मारुती बोडेकर याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. माझा जीव फक्त त्याच्यामुळेच गेलाय. त्याला शिक्षा द्या; तरच माझ्या आत्म्याला शांती लाभेल, असा उल्लेख चिठ्ठीत आढळला.तरुणीच्या आत्महत्येने खळबळजवळच्याच तरुणाने त्रास दिल्याने तरुणीला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी बोंद्रेनगर परिसरात तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस