शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शेतमजुरांना चहा द्यायला गेला, मधमाश्यांनी अचानक हल्ला केला; तरुणाचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:01 IST

‘विकू’च्या अकाली जाण्याने लिंगनूरकर हळहळले

गडहिंग्लज : प्रेमळ स्वभाव, हसतमुख, भेटेल त्यांच्याशी आदराने बोलून मने जिंकणाऱ्या ‘विकू’च्या अकाली जाण्याने लिंगनूरकर हळहळले. शेतमजुरांना चहा द्यायला गेलेल्या ‘विकू’वर मधमाश्यांनी अचानक हल्ला केला अन् घात झाला. विकास काशिनाथ घुगरे (वय २९, रा. लिंगनूर कानूल, ता. गडहिंग्लज) असे दुर्देवी मृत तरुणाचे नाव आहे.ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, सातवीनंतर शाळा सोडलेला विकास शेतीत रमला होता. अलीकडे त्याने गोठा प्रकल्पात जातीवंत गायी-म्हशी बाळगल्या होत्या. घरच्यांबरोबरच गावकरीही त्याला प्रेमाने ‘विकू’ म्हणूनच हाक मारत.मंगळवारी (दि. १०) दुपारी चारच्या सुमारास तो शेतात कामाला आलेल्या मजूर महिलांना चहा देण्यासाठी गेला होता. भर उन्हात उठलेल्या आग्या मोहळातील मधमाश्यांनी त्याच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झाल्यामुळे त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, बुधवारी सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्नशेतात चहा पिताना मधमाश्यांनी अचानक केलेल्या हल्यामुळे तो चक्कर येऊन जागीच कोसळला. घाबरलेल्या शेतमजूर महिला आरडाओरडा करत सैरावैरा पळाल्या. त्यांच्या आवाजाने शेतवडीतील नागरिक व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांनी त्याला तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनीही शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही.

कुटुंबीयांना धक्का‘गोकुळ’तर्फे सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकाला देण्यात येणारा ‘गोकुळ श्री’चा मान त्याचे वडील काशिनाथ यांनी दोनदा पटकाविला आहे. गोठ्याचे व्यवस्थापन ‘विकास’च करत होता. त्याच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Bee attack while serving tea kills young farmer.

Web Summary : A young farmer, Vikas Ghugare, died in Lingnur Kanul after a sudden bee attack while serving tea to farm laborers. Despite medical efforts, he succumbed to his injuries, leaving his family in shock. He was known for his kindness and successful dairy farm management.