शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक, चौकशीत दिली उडवा उडवीची उत्तरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 15:57 IST

शाहूपुरी पोलिसांची कारवाई : दोन लाखांवर मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : कदमवाडीत रस्त्याकडेला बेकायदेशीरपणे एमडी ड्रग्ज विक्री करण्यासाठी आल्याप्रकरणी ऋषीकेश प्रफुल्ल जाधव ( वय २८, गीता अपार्टमेंट, घाटगे कॉलनी, कोल्हापूर) यास गुरुवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पांढरट साखरेची बारीक पावडर वजा खड्याप्रमाणे दिसणारा एमडी ड्रग्जसदृश ४.३ ग्रॅम पदार्थ, पारदर्शक पिशवी, एक मोबाइल फोन, बुलेट असा एकूण २ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.मुख्यालयातील पोलिस मिलिंद नानासाहेब टेळी यांनी याबाबतची फिर्याद दिली. पोलिसांनी सांगितले की, कदमवाडीत मुख्य रस्त्यावर एकजण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक करून सापळा रचला. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास बुलेटवरून एकजण आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने ऋषीकेश जाधव असे नाव सांगितले. त्याने माझा धंदा ड्रायव्हिंग असून, घाटगे कॉलनीत राहत असल्याची माहिती दिली. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी त्याची सखोल अंगझडती घेतली. यात त्याच्या शर्टाच्या खिशात एक मोबाइल, एक प्लॅस्टिकची लहान पिशवी मिळून आली. पिशवीत पांढरट रंगाची साखरेसारखी बारीक पावडर, खड्यासारखा पदार्थ दिसून आला. डोके यांनी त्याला यासंबंधी विचारणा केली. त्यावेळी संशयित आरोपी जाधव यांनी प्लॅस्टिक पिशवीत एमडी ड्रग आहे. ते मी विक्रीसाठी आणले आहे, असे स्पष्ट केले. त्यानंतर पंचासमक्ष मुद्देमाल जप्त केला.

एमडी ड्रग्ज किंवा....जप्त केलेल्या पदार्थाची तपासणी करून घेण्यासाठी जागेवरच न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या उपसंचालकांना बोलवून घेतले. त्यांनी प्रथमदर्शनी एम. डी. ड्रग किंवा मेथाम्फेटामाइन, मेथाक्वॉलोन, ॲम्फिटामाइनसदृश पदार्थ असू शकतो, असा निष्कर्ष काढला. पोलिस निरीक्षक डोके यांनी आरोपी जाधव यांच्याकडे ड्रग्जचा साठा कोठे करून ठेवला आहे, अशी विचारणा केली. मात्र त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.

मुंबईहून आणल्याची माहितीएमडीसदृश अमली पदार्थ मुंबई येथून विकत घेतले. हा पदार्थ ग्राहकांना विक्री करीत असतो, अशी माहिती संशयित आरोपी जाधव यांनी पोलिसांना दिली. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Youth Arrested for Selling MD Drugs, Gives Evasive Answers

Web Summary : A youth was arrested in Kolhapur for illegally selling MD drugs. Rishikesh Jadhav was caught with drugs and a mobile phone worth ₹2.02 lakh. He claimed to have bought the drugs from Mumbai, but provided inconsistent answers during questioning. Police are investigating the case further.