शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: नग्न फोटो पाठव नाहीतर ठार मारतो, तरुणीला धमकावणाऱ्यास अटक

By उद्धव गोडसे | Updated: April 16, 2024 14:15 IST

सायबर, शाहूपुरी पोलिसांची सापळा रचून कारवाई, दोघे एकाच कॉलेजमधील

कोल्हापूर : कॉलेजमधील तरुणीच्या इन्स्टा अकाउंटवर अश्लील मेसेज करून, ‘नग्न फोटो पाठव नाहीतर तुला ठार मारतो’, असे धमकावणाऱ्या तरुणास सायबर आणि शाहूपुरी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अमरनाथ कृष्णा दफ्तरदार (वय २२, रा. गोकुळ शिरगाव, ता. करवीर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. नागाळा पार्क येथे रविवारी (दि. १४) सायंकाळी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी आणि अमरनाथ दफ्तरदार हे दोघे एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतात. अमरनाथ याने तिच्या इन्स्टा अकाउंटवर अश्लील मेसेज केले. याबाबत तरुणीने घरी नातेवाइकांना सांगितले. त्यानंतर नातेवाइकांनी संशयित अमरनाथ याची भेट घेऊन त्याची समजूत घातली होती. मात्र, त्यानंतरही इन्स्टा अकाउंटवरून अश्लील मेसेज पाठवणे आणि बदनामी करण्याचा प्रकार त्याने सुरूच ठेवला. तुझे नग्न फोटो पाठव, नाहीतर तुला ठार मारतो, असा धमकीचा मेसेज त्याने पाठवला होता.

त्याच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिस आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यातील निर्भया पथकाने पीडित तरुणीच्या मोबाइलवरून अमरनाथ याला फोन केला. भेटण्यासाठी त्याला नागाळा पार्कातील एका आईस्क्रीम पार्लरमध्ये बोलवून घेतले. त्यावेळी सापळा रचून त्याला अटक केली.

अधिक चौकशीत त्याने अश्लील मेसेज पाठवल्याची कबुली दिली. न्यायालयात हजर केले असता, त्याची गुरुवारपर्यंत (दि. १८) पोलिस कोठडीत रवानगी झाली. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्यासह तानाजी चौगुले, निर्भया पथकातील नंदा सुतार, मनिषा गुरव, मनिषा मोंगल, स्मिता जाधव, शिवसेन पाटील, सायबरचे सागर माळवे, संगीता खोत आणि दिलीप पवार यांनी कारवाई केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस