शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

कोल्हापूर: जाब विचारण्यास गेला अन् मारहाणीत जीवास मुकला, दोघांवर खूनाचा गुन्हा

By तानाजी पोवार | Updated: October 8, 2022 18:17 IST

सागरच्या डोक्यास व छातीला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुध्द पडला. यावेळी संशयित पळून गेले.

कोल्हापूर : ‘ये’ अशी एकेरी हाक मारल्याच्या रागातून जाब विचारला, अन् झालेल्या बेदम मारहाणीत एक तरुण जीवास मुकला. ही घटना कोल्हापुरात घडली. पंधरा दिवसापूर्वी मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान आज, शनिवारी दुपारी मृत्यू झाला. सागर राजेंद्र शिर्के (वय ३२ रा. १३२९, डी वॉर्ड, भूसारी गल्ली, उत्तरेश्वर पेठ) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दोघां संशयितावर खूनाचा गुन्हा नोंदवला. सौरभ प्रमोद सरनाईक (वय ३२ रा. देवणे गल्ली, मंगळवार पेठ), अक्षय अनिल साळोखे (वय ३० रा. शिवाजी पेठ) अशी संशयितांची नावे आहेत. संशयित कारागृहात आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर शिर्के हा चहा पावडर विक्रीचा व्यवसाय करतो, त्याला दोन जुळ्या मुले, पत्नी, आई, वडील व तीन भाऊ असा परिवार आहे. दि. २३ सप्टेंबरला मध्यरात्री सागर व मित्र प्रदीप उर्फ बाल्या धोंडीराम आबीटकर (वय ४३ रा. सोनाळी, ता. भदरगड) हे दोघे दुचाकीवरुन पापाची तिकटीकडून माळकर तिकटीकडे जात होते. त्याचवेळी सौरभ सरनाईक व अक्षय साळोखे हे दोघे संशयित आपल्या दुचाकीवरुन पापाची तिकटीकडे जात होते. त्यांनी सागर व प्रदीपला ‘ये’ अशी मोठ्या आवाजात एकेरी हाक मारली.दोघांनी रागातच आपली दुचाकी वळवून संशयितांजवळ नेऊन त्याबाबत जाब विचारला. चौघामध्ये वादावादी झाली, सागरला रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. प्रदीप आबीटकरला मारहाण झाली. सागरच्या डोक्यास व छातीला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुध्द पडला. संशयित पळून गेले. तेथून निघालेल्या अलंकर शिवाजी गिरी (रा. उत्तरेश्वर पेठ) त्याने जखमी सागर व प्रदीप यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. दि. २७ सप्टेंबरला गिरी याच्या फिर्यादीवरुन लक्ष्मीपुरी पोलीसांनी दोघां संशयितावर प्राणघातक हल्ल्याच्या गुन्हा नोंदवला.दरम्यान, उपचार सुरु असताना जखमी सागर शिर्के याचा शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर दोघा संशयितावर खूनाचा गुन्हा नोंदवला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस