शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बाबा, एकदा तरी माझ्याशी बोला ना..!, चिमुकलीची आर्त हाक, रंगकाम करताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:17 IST

कष्टाने फुलवलेला संसार करपला

कोल्हापूर : माणूस मरतो म्हणजे नेमके काय होते ते कळायच्या आधीच चिमुकलीच्या वडिलांना नियतीने हिरावून घेतले. बाबा.. बाबा.. म्हणत ती अश्रू ढाळत सीपीआरच्या अपघात विभागाबाहेरील गर्दीत वडिलांना शोधत होती. अखेर निपचित पडलेल्या बाबांना तिने पाहिले. बाबा, एकदा तरी माझ्याशी बोला ना.. अशी आर्त हाक तिने मारताच उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला अन् अनेकांना अश्रू अनावर झाले. ही घटना रविवारी (दि. २२) दुपारी सीपीआरमध्ये घडली.नवे पारगाव येथील होतकरू तरुण सागर शिंदे हा पत्नी बिना, मुलगा अंश (१०) आणि मुलगी श्रीशा (७) हिच्यासह नवे पारगाव येथे राहत होता. मेहुणा राजकुमार बनसोडे याच्यासोबत तो इमारती रंगविण्याचे काम घेत होता. रविवारी सकाळी घुणकी येथील एका घराचे रंगकाम करण्यासाठी दोघे गेले होते. राजकुमार खालच्या मजल्यावर रंगकाम करीत होता, तर सागर वरच्या मजल्यावरील लोखंडी रेलिंग रंगविण्यासाठी गेला होता.लोखंडी पाइपला रोलर लावून रंगकाम करताना त्याची पाइपजवळच असलेल्या विजेच्या तारेला चिकटली. काही वेळ तो तिथेच चिकटून राहिला. शेजाऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच विजेचा प्रवाह बंद करून त्याला खाली आणले. १०८ रुग्णवाहिकेतून त्याला सीपीआरमध्ये दाखल केलेे. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.मेहुणा राजकुमार यांनी याची माहिती घरी कळवताच सागरची पत्नी, तिची आई आणि सात वर्षांची चिमुकली श्रीशा सीपीआरमध्ये पोहोचले. पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच बिना यांचे हातपाय गळाले. आईने हंबरडा फोडला. चिमुलकी श्रीशाची नजर तिच्या वडिलांना शोधत होती. आई आणि आजीला रडताना पाहून तिच्याही डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. बाबा..बाबा असे म्हणत ती बाबाला शोधत होती. मध्येच मामाकडे जाऊन मला बाबा दाखव, असा आग्रह करीत होती.बाबाला भेटण्याची चिमुकलीची धडपड आणि कुटुंबाची हतबलता पाहून उपस्थितांनाही गहिवरून आले. अखेर बाबाला पाहताच एकदा तरी माझ्याशी बोल ना..अशी आर्त हाक तिने घालताच अनेकांनी बराच वेळ थांबवून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटलाच. असे दु:ख कोणाच्याही वाट्याला येऊ नये अशीच भावना सगळ्यांच्या डोळ्यात दिसत होती.कष्टाने फुलवलेला संसार करपलासागरच्या वडिलांनी २५ वर्षांपूर्वी आईचा खून केला होता. आईचे छत्र हरवले आणि वडील तुरुंगात गेल्यानंतर चुलत्यांच्या पाठबळावर सागर जिद्दीने संसार फुलवत होता. शिक्षा भोगून सुटलेल्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. आता सगळे काही सुरळीत होत असताना अचानक नियतीने सागरवर घाला घातल्याने नवे पारगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.