शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन खरेदी केले; कोल्हापुरातील एका तरुणाला जुने कपडे आले!; फसवणुकीचा नवा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 12:43 IST

बोगस वेबसाइटवरून फसवणुकीचे प्रकार वाढल्याने ऑनलाइन खरेदी बेभरवशाची बनली

कोल्हापूर : पाचगावातील एका तरुणाने ई-कार्ट या वेबसाइटवरून नव्या कपड्यांची ऑनलाइनखरेदी केल्यानंतर त्यांना जुने आणि फाटलेले तीन शर्ट आले. संबंधित वेबसाइटच्या ग्राहक सेवा केंद्रावरून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे याबाबत कोणाकडे दाद मागायची? असा प्रश्न पडला आहे. बोगस वेबसाइटवरून फसवणुकीचे प्रकार वाढल्याने ऑनलाइनखरेदी बेभरवशाची बनली आहे.सोशल मीडिया चाळताना मोबाइलच्या स्क्रीनवर ई-कार्टची जाहिरात दिसताच पाचगावातील तरुणाने तीन शर्टची ऑनलाइन खरेदी केली. कपड्यांचा दर्जा उत्तम असल्याचा उल्लेख जाहिरातीत केला होता. त्याचे फोटोही दाखवले होते. फोटोत दिसणारेच शर्ट घरपोच केले जातील, असा उल्लेख त्यात केला होता. ऑनलाइन ऑर्डर बुकिंग झाल्यानंतर आठवडाभराने रविवारी घरच्या पत्त्यावर शर्ट पोहोचतील असा मेसेज मोबाइलवर आला.सायंकाळी डिलिव्हरी बॉयचा फोन आला. त्याने कपड्यांचे पार्सल घरी पोहोच केले. मात्र, ते फोडून पाहताच त्यातून जुने, मळकट आणि फाटलेले तीन शर्ट निघाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ई-कार्टच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण कंपनीचे सर्व नंबर बंद लागत होते. त्यांच्या वेबसाइटवर कपडे परत घेण्याची व्यवस्थाही उपलब्ध नाही. याबाबत त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली.बनावट ॲप, वेबसाइटनामांकित कंपन्यांच्या नावे अनेक बनावट ॲप आणि वेबसाइट सुरू आहेत. सोशल मीडियात त्या स्क्रोल होत राहतात. खऱ्या आणि बोगस कंपन्यांच्या ॲपमध्ये काहीच फरक नसल्याने ते ओळखू येत नाहीत. ऑफर्स, आकर्षक जाहिराती आणि माफक किमतीमुळे खरेदी केली जाते. मात्र, पार्सल घरी पोहोचताच फसवणुकीचा प्रकार उघडकीस येतो. त्यामुळे ऑनलाइन खरेदी फसवणुकीला निमंत्रण देणारी ठरत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरonlineऑनलाइनfraudधोकेबाजीShoppingखरेदी