शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पंधरा दिवसांपूर्वी ठरले लग्न, बोहल्यावर चढण्यापूर्वीच आजऱ्यातील तरुणाचा गोव्यात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:12 IST

छातीत दुखत असल्याने अभिषेकने होणाऱ्या पत्नीला फोनवरुन कल्पना दिली, पण..

आजरा : आजरा शिवाजीनगरमधील अजित देसाई कुटुंबीय मुलगा अभिषेकचे लग्न ठरले म्हणून आनंदात होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अभिषेक अजित देसाई (वय ३१) या तरुणाचा गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज सकाळी मृत्यू झाला. पंधरा दिवसांपूर्वी लग्न ठरले व दिवाळीत चांगल्या पध्दतीने लग्न करण्याचा दोन्ही कुटुंबियांनी निर्धार केला. पण बोहल्यावर चढण्यापूर्वीच अभिषेकचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.अजित देसाई हे वाटंगी येथील विकास सेवा संस्थेत सचिव म्हणून काम करतात. मोठा मुलगा बारामती येथे नोकरीस आहे. तर अभिषेक हा वाणिज्य शाखेतील पदवीधर असल्याने गोव्यातील खासगी कंपनीत नोकरीस होता. त्याची होणारी पत्नीही गोव्यातीलच कंपनीत नोकरीस आहे. पंधरा दिवसांपूर्वी या दोघांचा विवाह ठरला होता. दिवाळीत लग्न करण्याचे निश्चीत झाले होते. लग्न ठरल्यामुळे दोन्ही कुटूंबिय आनंदात होती. काल अभिषेकला सर्दी झाली होती. सर्दी तापाची गोळी घेऊन तो झोपला. पण झोप लागली नसावी. त्याच्या छातीत दुखत असल्याने पहाटे ६.३० वाजता अभिषेकने आपल्या होणाऱ्या पत्नीला फोनवरुन याची कल्पना दिली. तातडीने त्यांचे कुटुंबिय अभिषेक राहत असलेल्या ठिकाणी पोहोचले. पण आतून दरवाजा बंद होता. आवाज दिला तरीही अभिषेकने दार न उघडल्याने सर्वांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. घरमालकाने पोलिसांना बोलावून दार मोडून आतमध्ये प्रवेश केला. तर समोरचे दृश्य विचित्रच होते. अभिषेकला रक्ताची उलटी झाली होती व त्याच ठिकाणी तो निपचीत पडला होता.बोहल्यावर चढण्यापूर्वीच अभिषेकचा झालेला मृत्यू सर्वांना चटका लावून गेला. अभिषेकला पाहून आई-वडिलांनी फोडलेला हंबरडा सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओलावून गेल्या. सायंकाळी अभिषेकवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, भावजयी असा परिवार आहे.