शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर कोपार्डेमध्ये शेतवडीत तरुणाचा मृतदेह आढळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 14:49 IST

प्रकाश पाटील कोपार्डे : कोपार्डे (ता. करवीर) येथे कोल्हापूर -गगनबावडा रस्त्याला लागून असलेल्या शेतवडीत तरुणाचा मृतदेह आढळला. संतोष ज्ञानदेव ...

प्रकाश पाटील

कोपार्डे : कोपार्डे (ता. करवीर) येथे कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याला लागून असलेल्या शेतवडीत तरुणाचा मृतदेह आढळला. संतोष ज्ञानदेव पोतदार (वय ४०, रा. पणुत्रे ता. पन्हाळा) असे या मृत तरुणाचे नाव आहे. गावात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत आडुरच्या पोलिस पाटील सरीता पोवार यांनी करवीर पोलिसांना माहिती दिली.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संतोष पोतदार हा व्यसनी होता. त्याच्या आई-वडीलांचे निधन झाले आहे. त्याला चार बहिणी आहेत. त्यातील तिघी विवाहित आहेत तर, एक अविवाहित आहे. तो व्यसनी असल्याने घरी थांबायचा नाही. त्याच्या व्यसनाला कंटाळून लहान बहिणीने कोल्हापूर येथे नोकरी करत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. संतोष अविवाहित होता. आज सकाळी कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील कोपार्डे येथील फरशीच्या ओढ्याजवळ संतोष मृतावस्थेत आढळला. याची माहिती आडूरच्या पोलिस पाटील सरीता पोवार यांना मिळताच त्यांनी करवीर पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस