शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाचा डिझेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न, कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 14:08 IST

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतले

कोल्हापूर : इचलकरंजीतील वडिलोपार्जित जमीनवाटपाच्या वादातून गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात तेजपाल महावीर चौगुले (वय ३२ ) या तरुणाने डिझेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा व आत्महत्येचा प्रयत्न या दोन्ही कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.सकाळी सव्वाअकराच्या सुमारास चौगुले कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आले. त्यानंतर तेजपाल याने स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून घेतले. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्यांनी बघून पोलिसांना हाक मारली. पोलिस हवालदार खुदबुद्दीन मुजावर व तेजपाल यांच्यात थोडी झटापट झाल्यावर त्यांनी तेजपालला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेले.चौगुले कुटुंबाची चार गटांमध्ये १ हेक्टर ३ आर, ३६ गुंठे, ३ गुंठे अशी वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीवरून दोन भावांमध्ये वाद आहे. तो तहसीलदारांकडे गेल्यानंतर त्यांनी जमिनीची मोजणी करून भावांमध्ये तिचे समान वाटप केले. याच दरम्यान उच्च न्यायालयातदेखील तेजपाल चौगुले कुटुंबाच्या बाजूने निकाल लागला.

मात्र दुसऱ्या भावाने तहसीलदारांच्या विरोधात इचलकरंजी प्रांतांकडे याचिका दाखल केली. त्यानंतर प्रांतांनी भूमी अभिलेख विभागाला जमिनीच्या पुनर्मोजणीचे आदेश दिले. त्या आशयाची नोटीस भूमी अभिलेखने चौगुले कुटुंबाला काढली. एकदा जमीन वाटप झाल्यानंतर पुनर्मोजणी का? या मुद्द्यावरून चौगुले कुटुंबाने आत्मदहनाचा इशारा दिला होता. या घटनेनंतर कुटुंबीयांनी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी शिंदे यांनी विरोधात निकाल लागलेल्या व्यक्तीला दाद मागण्याचा अधिकार आहे. हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. आत्मदहनाचा इशारा देण्याऐवजी न्यायालयीन पातळीवर प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी