शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तधन शोधाच्या तगाद्याला कंटाळून कोल्हापुरातील 'त्या' महिलेचा खून, मांत्रिकास अटक

By तानाजी पोवार | Updated: October 1, 2022 17:07 IST

जुन्या मांत्रिकाशी वाढलेली मैत्री संशयीत पोवार याला सतावत होती

कोल्हापूर : बालिंगा ते शिरोली दुमाला रोडवरील पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील शेतात आरती आनंद सामंत (वय ४५ रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) या महिलेचा खून हा गुप्तधन शोधाच्या तगाद्याला कंटाळून जोगेवाडीच्या मांत्रिकाने केल्याचे निष्पन्न झाले. नामदेव शामराव पोवार (वय ३४ रा. जोगेवाडी, ता. राधानगरी) असे अटकेतील मांत्रिकाचे नाव असल्याची माहिती करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.पाडळी खुर्द येथे शेतात गुरुवारी रात्री आठ वाजता आरती सामंत यांचा खून झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. करवीर पोलिसांनी घटनास्थळाची परिस्थिती, मोबाईल लोकेशन तपासत संशयित मांत्रिक नामदेव पोवार याला राशिवडे येथील बिरदेव मंदीराच्या आवारात अटक केली. त्याने गुन्ह्याची कबूली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.गुप्तधन काढून दे...आपल्या घरात गुप्तधन असल्याचे स्वप्नात येत असल्याचे मृत आरती सामंत ह्या वारंवार सांगत होत्या. त्यांनी काही मांत्रिकांना गुप्तधन काढून देण्याबाबत तगादा लावला होता. पुलाची शिरोली येथीलही एका मांत्रिकाला त्यांनी गुप्तधनाबाबत माहिती दिली. त्याचे त्यांच्याशी मैत्रिपूर्ण संबध वाढले होते, त्यानंतर सहा महिन्यापासून सामंत यांनी नामदेव पोवार याही मांत्रिकामागे गुप्तधन शोधून देण्याबाबत तगादा लावला. त्यांची जुन्या मांत्रिकाशी वाढलेली मैत्री संशयीत पोवार याला सतावत होती. त्याच रागातून व गुप्तधन शोधाच्या तगाद्याला कंटाळून संशयिताने सामंत यांच्या डोक्यात वीट मारुन खून केला. अंगावरील सोन्याच्या पाटल्या, मंगळसुत्र, बांगड्या व मोबाईल असा मुद्देमाल चोरुन पोबारा केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस