शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

kolhapur: बँकॉकमध्ये इमारतीवरून पडून शिरगावच्या महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 13:11 IST

शिरगाव : शिरगाव ( ता. राधानगरी ) येथील सुनील ईश्वरा जाधव याच्या पत्नी गीता सुनील जाधव (वय ४५) यांचा ...

शिरगाव : शिरगाव ( ता. राधानगरी ) येथील सुनील ईश्वरा जाधव याच्या पत्नी गीता सुनील जाधव (वय ४५) यांचा थायलंडमधील बँकॉक शहरात एका इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, उद्या दुपारी मृतदेह शिरगावला येण्याचा अंदाज आहे.येथील सुनील जाधव हे आपली पत्नी गीता आणि मुलगा ओंकार सुनील जाधव ( वय १६ ) यांच्यासह बँकॉक इथे नोकरीनिमित्ताने राहत होते. गीता यांचे बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स शिक्षण झाले होते. २००३ साली लग्न होऊन त्या सुनीलसोबत संसार करत होत्या. सुरुवातीला दोघेही गोवा येथे नोकरी करत होते. त्यानंतर २०१८ पासून थायलंडमध्ये नोकरीनिमित्ताने वास्तव्य करत आहेत. बॉश कंपनीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत.२२ मार्च रोजी सुनील कंपनीमध्ये कामांवर गेला होता. गीता या मुलगा ओंकारसह घरी होत्या. कपडे वाळत घातलेले होते ते काढण्यासाठी गीता गेल्या असता त्यांचा पाय घसरून नवव्या मजल्यावरून पडल्याने जागीच मृत्यू झाला. मुलगा ओंकार बाथरुममध्ये असताना ही घटना घडली. त्याने वडिलांना फोनवरून घटनेची माहिती दिली. वडील आपल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन तेथे आले आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. सर्व सोपस्कार पूर्ण करून मंगळवारी मृतदेह मुंबईमध्ये विमानाने घेऊन तो उद्या दुपारी शिरगावमध्ये येणार आहे.गीता यांचे माहेर आरळे ( ता.करवीर ) हे असून, त्यांचे आई-वडील मुंबईमध्ये स्थायिक झालेले आहेत. ते सेवानिवृत्त पोलिस अधिकारी असून, भाऊ पोलिस खात्यात नोकरीला आहेत. गीता यांच्या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू