शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
2
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
3
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
4
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
5
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
6
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
7
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
8
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
9
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
10
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
11
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
12
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
13
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
14
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
15
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
16
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
17
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
18
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
19
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
20
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील शेतकरी महिलेने ३० गुंठ्यातील सोयाबीनच्या उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 14:14 IST

संकटातून सावरण्यासाठी सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे

देवाळे (जि. कोल्हापूर) : मोहरे (ता. पन्हाळा) येथील शेतकरी महिलेने उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला. तीस गुंठ्यात जूनमध्ये सोयाबीन पीक घेतले होते. नदीला आलेल्या महापुरामुळे सोयाबीन पीक पाण्याखाली गेल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हतबल शेतकरी महिलेने सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याचा निर्णय घेतला.मोहरे येथील गट नंबर १७८ ब मधील ३० गुंठ्यामध्ये शेतकरी महिला भारती बाबुराव पवार यांनी जून महिन्यात सोयाबीनचे पीक घेतले होतं. सोयाबीनचे पीक चांगले जोमदार आले होते. जून महिन्यापासून सततच्या पावसामुळे वारणा नदीला दोन वेळा महापूर आल्याने शेती पाण्याखाली गेली होती. यामुळे सोयाबीन पीकाचे मोठे नुकसान झाले. हतबल होवून शेतकरी महिलेने पीक पुन्हा वाढवण्याचा खर्च वाया घालवण्याऐवजी पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याचा निर्णय घेतला. अन् उभ्या सोयाबीन पिकावर टॅक्टर फिरवत रोष व्यक्त केला. शेतकऱ्याने शेतात सोयाबीन पिकावर आतापर्यंत १० ते १५ हजारांचा खर्च केला होता. तरीही सोयाबीन पिकातून काहीच हाती लागणार नाही हे लक्षात आल्यानंतर टोकाचे पाऊल उचलले आणि सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला. शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Farmer Destroys Soybean Crop After Flood Damage: A Loss

Web Summary : A Kolhapur farmer, facing massive losses from flood-damaged soybean crops, drove a tractor over her 30-guntha field in despair. Heavy rains and floods ruined the crop despite significant investment, leaving her with no harvest and prompting the drastic action.