शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

Kolhapur Crime: प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दफनभूमीत पुरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 11:52 IST

पत्नीसह चौघांना अटक; अनैतिक संबंधाचा संशय 

शिरोळ : धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथे अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचाच खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. संजय अल्लाबक्ष शिकलगार (३८, मूळ गाव यादवनगर जयसिंगपूर, सध्या रा.लक्ष्मीनगर, धरणगुत्ती) असे मृताचे नाव आहे.धारदार कोयत्याने मानेवर व डोक्यात वार करून खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह दफनभूमीत पुरण्यात आला होता. याप्रकरणी प्रियकर दर्शन भगवान कांबळे, अमृत भगवान कांबळे, स्वागत विजय कांबळे व पत्नी दीपा संजय शिकलगार यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खुनाच्या या घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे.संजय हा गोवा राज्यात गवंडी काम करत होता. पत्नीच्या अनैतिक संबंधावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. यातूनच गुरुवारी (दि. २७) रात्री ८ वाजेच्या सुमारास संजय याला घरातून पत्नी दिपा, दर्शन कांबळे व त्याचा भाऊ अमृत व चुलता स्वागत कांबळे यांनी घेऊन धरणगुत्ती येथील माळभागावरील पाण्याच्या टाकीच्या परिसरातील दफनभूमीजवळ आले. त्यानंतर संजयच्या डोक्यात व मानेवर कोयत्याने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह शेजारीच असणाऱ्या दफनभूमीतील खड्ड्यात पुरण्यात आला. घटनेचा उलगडा झाल्यानंतर संशयित दर्शन याला घेऊन मृतदेह पुरलेल्या जागेची पाहणी केली. त्याठिकाणी तहसीलदार अनिलकुमार हेळकर, पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.खुनाचा झाला उलगडासंजय हा गोवा येथे गवंडी काम करत होता. २६ फेब्रुवारी रोजी तो धरणगुत्ती येथे आला होता. २७ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तो बेपत्ता झाल्याची वर्दी भाऊ अनिल शिकलगार याने ४ मार्च रोजी शिरोळ पोलिस ठाण्यात दिली होती. याचवेळी संजयचा घातपात झाल्याचाही संशय नातेवाइकांनी व्यक्त केला होता. त्यानंतर शिरोळ पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत पत्नी दीपा, दर्शन कांबळेसह त्याचा भाऊ व चुलत्याला ताब्यात घेतल्यानंतर खुनाची घटना उघडकीस आली.मृतदेह दफनभूमीत पुरलाधरणगुत्ती येथील लिंगायत दफनभूमीजवळ संजय याला घेऊन संशयित चौघेजण आले होते. यावेळी कोयत्याने त्याच्या डोक्यात व मानेवर सपासप वार करून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने याच दफनभूमीतील खड्ड्यामध्ये संजयचा मृतदेह पुरण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस