शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ट्रेडिंग व्यापाऱ्याकडून तीन ते चार कोटींचे दिवाळे?, इचलकरंजीत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 17:15 IST

इचलकरंजी : येथील मंगलमूर्ती चित्रमंदिर परिसरातील एका ट्रेडिंग व्यापाऱ्याने तीन ते चार कोटी रुपयांचे दिवाळे काढल्याची चर्चा शहरात सुरू ...

इचलकरंजी : येथील मंगलमूर्ती चित्रमंदिर परिसरातील एका ट्रेडिंग व्यापाऱ्याने तीन ते चार कोटी रुपयांचे दिवाळे काढल्याची चर्चा शहरात सुरू आहे. यामध्ये अडकलेल्या काही सूत व्यापाऱ्यांनी गावभाग पोलिस ठाण्यात धाव घेत गाऱ्हाणे मांडले. मात्र, रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल झाली नव्हती. या प्रकारामुळे वस्त्रोद्योगात खळबळ उडाली आहे.पलायन केलेला तो व्यापारी सूत खरेदी करून कापड विणण्यासाठी यंत्रमागधारकांना देत होता. तसेच तयार कापड पुढे विक्री करीत होता. परंतु काही दिवसांपासून त्याच्याकडून व्यापाऱ्यांची देणी थकल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे काही सूत व्यापारी तसेच सराफी करणाऱ्यांनी त्याच्याकडे वसुलीसाठी तगादा लावला होता. या तगाद्यामुळे संबंधित व्यापाऱ्याने दोन दिवसांपूर्वी पत्नीसह शहरातून पलायन केल्याची चर्चा आहे. त्याचा संपर्क होत नसल्याने शुक्रवारी दिवसभर सूत बाजारात खळबळ उडाली होती. काही व्यापाऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. संबंधित व्यापाऱ्याचा संपर्क होत नसून त्याच्या परिवारातील काही सदस्य अजूनही शहरात आहेत. त्यामुळे सर्वजण निघून जाण्यापूर्वी त्याचा शोध घ्यावा आणि कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केल्याचे वृत्त आहे. परंतु प्रत्येकाचा आकडा वेगवेगळा असल्याने एकूण निश्चित आकडा समोर आला नाही. याबाबत काहींनी एकत्र येत तक्रार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या अंदाजे तीन ते चार कोटींचे दिवाळे काढल्याची चर्चा आहे.

दरम्यान, पैशांसाठी काही सूत व्यापाऱ्यांनी त्याच्याकडे तगादा लावला होता. तसेच त्याला धमकावण्यात येत होते. त्यामुळेच त्याने पत्नीसह शहर सोडल्याचीही चर्चा आहे. याबाबत अडकलेल्या रकमेचा संबंधितांनी हिशेब केल्यानंतर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस