शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बोगस प्रतिज्ञापत्रे प्रकरण: मुंबई पोलिसांचा चौकशीसाठी हातकणंगले, शिरोळ भागात ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 12:02 IST

संशयित व्यक्तीच्या नावे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील शिक्के व स्वाक्षरीमध्ये तफावतीचा संशय पोलीस पथकास आला आहे, अशा व्यक्तींना शोधून त्यांची भेट घेऊन थेट चौकशी सुरू असल्याचेही समजते.

कोल्हापूर : शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी काही प्रतिज्ञापत्रे बोगस असल्याच्या संशयावरून चौकशीसाठी मुंबई क्राइम ब्रँचच्या पथकाने हातकणंगले व शिरोळ भागात ठिय्या मारला. जिल्ह्यातून सादर झालेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी तब्बल १४०० प्रतिज्ञापत्रे बोगस असल्याचा संशय पथकास आहे. प्रतिज्ञापत्रावरील शिक्के, स्वाक्षरीमध्ये तफावत असल्याचे चौकशीत पुढे आले. त्यामुळे नेत्यांसह शिवसैनिक चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातर्फे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १४०० प्रतिज्ञापत्रावर शिक्के व स्वाक्षरीमध्ये तफावत आढळली. त्यामुळे मुंबई क्राइम ब्रँचच्या पथकाने कोल्हापुरात येऊन बुधवारपासून चौकशी सुरू केली आहे. कोल्हापूर शहरात काही तर हातकणंगले व शिरोळमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस प्रतिज्ञापत्र असल्याचा संशय पथकाने व्यक्त केला आहे.अनेक प्रतिज्ञापत्रे मृत व्यक्तीच्या तसेच अस्तित्वात नसलेल्यांच्या नावे असल्याचे चौकशीत पुढे आल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे पथक सखोलपणे चौकशी करत आहे. ही चौकशी आणखी काही दिवस चालणार असल्याचेही पथकातील एकाने सांगितले. काही संशयित बाबी चव्हाट्यावर आल्याने काही शिवसैनिक व नेते चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. या चौकशीमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.

थेट भेट, चौकशी

संशयित व्यक्तीच्या नावे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील शिक्के व स्वाक्षरीमध्ये तफावतीचा संशय पोलीस पथकास आला आहे, अशा व्यक्तींना शोधून त्यांची भेट घेऊन थेट चौकशी सुरू असल्याचेही समजते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाPoliceपोलिस